सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : शहरातील बाबुपेठ प्रभागाकडे चंद्रपूर मनपा प्रशासनाचे आज पावेताे दुर्लक्ष होत आले आहे .येथील आंबेडकर चौक व जूनोना चौक हे दोन्हीही ठिकाण अतिशय वर्दळीचे व रहदारीचे असून येथे बस थांबे दिलेले आहे.
मागील कित्येक वर्षा पासून बाबुपेठ जनतेंनी या दोन्ही चौकात सुलभ शौचालय देण्यात यावे अशी मागणी केली होती. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे ते होवू शकले नाही.याबाबत आम आदमी पार्टीचे शहर सचिव राजु कूडे यांच्या कडे या बाबतीत आटो रिक्षा चालक, व्यवसायिक तसेच येथील अनेक महिलांच्या तक्रारी आल्या हाेत्या. त्या अनुषंगाने काल मनपा आयुक्त यांच्याकडे एका निवेदनातून सुलभ शाैचालये बांधण्याची मागणी करण्यात आली हाेती. त्यांची मागणी रास्त असल्या मुळे आयुक्तांनी देखिल लवकरात लवकर ही समस्या साेडविण्याचे आश्वासन आपच्या शिष्टमंडळास या वेळी दिले.
निवेदन देतांना आपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय सिद्दावार, कोषाध्यक्ष भिवराज सोनी, शहर सचिव राजु कूडे, निखिल बारसागडे, चंदु माडुरवार, सागर बोबडे, कालिदास ओरके, सुजाता बोधेले, जयदेव देवगडे, भीमराज बागेसर, अंजु रामटेके, बाबाराव खडसे सुखदेव दारुंडे, सुरेंद्र जीवने, अमोल राजूरकर, जयंत थूल आदीं उपस्थित हाेते.
महिला तथा व्यापारी वर्गांची शौचालये अभावी होत असलेली कुचंबना थांबवा - आम आदमी पार्टीची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 17, 2022
Rating:
