टॉप बातम्या

नरसाळा येथील जागृत नवसाला पावणाऱ्या मारोतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : नरसाळा गावापासून १ किमी अंतरावर असलेल्या टेकडीवर श्री हनुमान मुर्तीची स्थापना करून येथील भुसारी कुटुंबाच्या वतीने त्या टेकडीवर छोटेसे मंदिराचे निर्माण करण्यात आले. सभोवताल चा सर्व परिसर निसर्गमय असून तेथील वातावरण रमणीय तथा धार्मिक आहेत.

नवसाला पावणारा मारोती म्हणून येथे महाप्रसादाचे  कार्यक्रम चालूच असतात. हनुमंतरायाच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांची गर्दी चांगलीच उसळतात. नरसाळा येथील हे देवस्थान जागृत असल्याने नेहमीच या ठिकाणी भाविक येताना दिसतात. भुसारी कुटुंब यांच्या कडून २००४ मध्ये या मंदिराचे निर्माण करण्यात आले आहे. तेव्हापासून आजतागायत येथे मोठ मोठे कार्यक्रमही होतात.

देवस्थानात आल्यावर तेथील धार्मिक वातावरण तसेच मनोकामना पूर्ण होतात, असे येथे येणारे भाविक सांगून जातात.
Previous Post Next Post