टॉप बातम्या

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन संपन्न


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : यवतमाळ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या तेजापूर येथे शनिवारी (ता. २६) ला विविध भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमापूर्वी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार त्यांचे गावातील मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

तेजापूर ते निंबाळा व देऊरवाडा या गावाला जाण्यासाठी नागरिकांना सोयीचे व्हावे त्यासाठी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार स्थानिक फंडातून पुलांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य मंगलाताई पावडे, माजी सभापती लीलाताई विधाते, दिनकर पाटील पावडे, सरपंच चंद्रभागा सहारे, आशु पानघाटे, गजानन मालेकर, आशिष मालेकार , भैयाजी भोयर, आशिष उमाटे, सचिन झाडे, मधुकर धांडे, कानोबा झाडे, गणेश काकडे ,छगन मालेकर, अमोल सहारे, व इतर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, गावकरी मोठ्या संख्येने हजर होते.
Previous Post Next Post