टॉप बातम्या

वरुड येथील चाळीस वर्षीय इसमाची विष प्राशन करून आत्महत्या

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : तालुक्यात आत्महत्याची मालिका कायम बघायला मिळते, वरूड (पारधीबेडा) येथील विजय सब्बल पवार नामक या चाळीस वर्षीय विवाहित इसमाची विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याची घटना उघडीस आली.

दि.११ फेब्रुवारी रोज शुक्रवारला विजय पवार हा दुपारी बकऱ्या चराईसाठी गावालगत असलेल्या जंगलात जातो म्हणून गेला असता १ वाजता च्या सुमारास गावालगत असलेल्या जंगलात विजय पवार यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याचे वृत्त आहे. 

या घटनेची माहिती जंगलात चराई साठी गेलेल्या शेरक्यांना दिसतात त्यांनी गावातील लोकांना या घटनेची माहिती दिली. ग्रामस्थांनी विजय याला मारेगाव ग्रामीण रूग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी यांनी विजय याला मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर मृत्यूदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिला.

सदर घटनेची पोलिसांनी आकस्मित मृत्युंची नोंद केली असून विजय यांच्या पाठीमागे आई, पत्नी, दोन मुले व बहिण असा आप्त परिवार आहे.
Previous Post Next Post