सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई ठक यांची प्रकृती गंभीर, सहकारी भगिनींनी त्यांच्या निवास्थानी जाऊन घेतली भेट
सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मंगलाताई ठक ह्या गेल्या 2018 पासून एका आजाराशी लढत आहे. बरेच उपचार केले परंतु आजाराने मंगला ताईं ची साथ सोडली नाही. त्यांना या आजाराचा भयंकर त्रास त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांच्या निकटवरतीयांनी सांगितले. मात्र, ठक यांनी हार न मानता रोज आपल्या सामाजिक कार्यात व्यस्त राहतात. दर रोज त्यांचा दोन, तीन खेड्यांचा प्रवास आजही करतात. आपल्या वेदना विसरून त्या लोकांच्या कामात मदत करतात. 12 ते 14 तास वर्क केल्याशिवाय त्या झोप घेत नाही. स्वतः आजारी असून देखील न थकता हसत मुखाने त्या लोकासमोर वावरतात.
बऱ्याच इलाजानंतर डॉक्टरांनी शेवटचा पर्याय म्हणून ऑपरेशन शिवाय पर्याय नाही असे सांगितले. सध्या त्या उपचार घेत आहे. त्यांच्या चाहत्या,महीला भगिनींनी त्यांची प्रकृती बरी व्हावी म्हणून प्रार्थना केली व मंगला ताईंना धीर दिला.
सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई ठक यांची प्रकृती गंभीर, सहकारी भगिनींनी त्यांच्या निवास्थानी जाऊन घेतली भेट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 11, 2022
Rating:
