टॉप बातम्या

खंडणी शिवारातील कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मारेगाव : खंडणी शिवारात कोंबड बाजारावर पोलिसांनी छापा मारून दोन आरोपींसह मुद्देमाल हस्तगत केला. ही घटना (ता.११ फेब्रु.) शुक्रवार ला दुपारी ४ वाजताच्या दरम्यान छापा मारून २ आरोपींना अटक करण्यात आली तर, २ आरोपिंनी पोबारा केला असल्याची माहिती आहे.

तालुक्यातील खंडणी शिवारात कोंबडा बाजार भरविला असल्याचे अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
त्या माहितीच्या आधारे सापळा रचल्यानंतर पोलिसांनी कोंबड बाजारांवर धाड टाकली. या धाड सत्रात २ आरोपींना अटक करण्यात आली असुन, २ आरोपी फरार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

या धाड दरम्यान, आरोपीकडून रुपये २९ हजार रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत कलम १२ (अ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

पुढील तपास पोलीस करीत आहे.
Previous Post Next Post