अनेक मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत चंद्रपूर नगरीत पार पडला मोठया थाटात गौरव व चंद्रपूर रत्न पुरस्कार वितरण समारंभ !
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : पार्थशर समाचारच्या वतीने चंद्रपूर गौरव चंद्रपूर रत्न पुरस्कार वितरण समारंभ नुकताच थाटात व उत्साहात चंद्रपूर नगरीत पार पडला.पार्थशर समाचार प्रथम वर्षाच्या निमित्ताने हा भव्य व नेत्रदिपक समारंभ आयोजित करण्यात आला होता.
दि. 9 फेब्रुवारी 2022 रोजी पार्थशर समाचारला 1 वर्ष पूर्ण झाले हाेते त्या निमित्त्याने 12 विविध क्षेत्रातील चंद्रपूर गौरव आणि चंद्रपूर रत्न पुरस्कार घाेषित करण्यात आले. त्यात चंद्रपुर जिल्ह्याच्या कोरपना सारख्या अति दुर्गम भागात उत्तम शैक्षणिक कार्य केल्याबद्दल दिलीप झाडे, पोलिस विभागात सायबर गुन्ह्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मुजावर अली, बालकांच्या क्षेत्रासाठी कुमारी जेबा खान यांना, पर्यावरण क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल स्वर्गीय विजय मार्कंडेवार, पत्रकारितेत उल्लेखनिय कार्या बाबत आशिष रैच यांना तर संगीत क्षेत्रात वेगळा ठसा उमटविल्याबद्दल संदीप कपूर यांना चंद्रपूर रत्न पुरस्कार देण्यात आले. या शिवाय रोहित दत्तात्रेय यांना क्रीडा क्षेत्रात क्रिकेट सारख्या खेळात भारतीय ग्रीन संघाकडून खेळून चंद्रपूरला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल, ईटीव्ही भारतचे जिल्हा प्रतिनिधी अमित वेल्हेकर यांना त्यांच्या पत्रकारितेतील कार्याबद्दल गाैरविण्यांत आले.
मतिमंद मुलांसाठी काम करणारी डॉ. प्राजक्ता कोळपकर यांना सामाजिक क्षेत्रात, अशोकसिंह ठाकूर यांना, चंद्रपूरचा इतिहास जगभर प्रसिद्ध करण्यासाठी आणि इतिहास क्षेत्रात विशेष कार्य करण्यासाठी तर चंद्रपूर जिल्ह्यातील मूलचे वयाोव्रूध्द डॉ. रामचंद्र दांडेकर यांना, रूग्णांच्या सामान्य स्थितीत आणि महाभयानक कोरोनाच्या काळात निस्वार्थी भावनेतुन चप्पलविना सायकलने फिरून रुग्णांची सेवा केल्याबद्दल, कलाक्षेत्रात अभिनय साकारुन बॉलीवूडची उंची गाठणाऱ्या जयंत गाडेकर यांना चंद्रपुर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आयोजित या भव्य व नेत्रदिपक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पोलिस उपअधीक्षक राधिका फडके यांनी विभूषित केले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ वकील, सामाजिक कार्यकर्ते, अधिवक्ता रवि भागवत, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोरडिया, तसेच शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व सहसंपर्क प्रमुख डॉ. रमेश भाऊ देशमुख व झी न्यूज जिल्हा प्रतिनिधी आशिष अंबाडे प्रामुख्याने उपस्थित हाेते . यांच्या हस्ते विजेत्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन या वेळी गौरविण्यात आले.
पार्थशर न्यूज चंद्रपूर गौरव व चंद्रपूर रत्न पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी Dy.SP फडके यांनी या वेळी बाेलतांना म्हटले की पार्थशर न्यूज चंद्रपुरात चांगले काम करीत असून चांगल्या कामासाठी आम्ही त्यांना सदैव सहकार्य देऊ! अधिवक्ता रवी भागवत यांनी पार्थशर वृत्ताचे संपादक राजेश नायडू यांचे कौतुक केले.
पार्थशर बातमीतील लहान ते मोठ्या गोष्टी डोळ्यांसमोर असल्याचे सांगून हे चॅनल कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात नसल्याचे त्यांनी सांगितले. जितेंद्र चोरडिया यांनी अल्पावधीत पार्थशर न्यूजचे नागपूर आणि विदर्भात पंख पसरविल्याबद्दल अभिनंदन केले . तर शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश देशमुख यांनी पार्थशरचे संपादक नायडु हे सतत समाजासाठी कार्य करीत असतात असे बाेलतांना सांगितले. या पुरस्कारांमुळे चंद्रपूरच्या ख्यातनाम लोकांची माहिती सर्वांना होईल असे ही त्यांनी या वेळी बाेलतांना म्हटले . दुसरीकडे, निवड समितीचे सदस्य असलेले झी न्यूजचे प्रतिनिधी आशिष अंबाडे यांनी पार्थशर समाचारच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना चंद्रपूरच्या जनतेचा सन्मान केल्याबद्दल वाहिनीचे कौतुक केले. व पार्थशर समाचारला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तदपुर्वि आपल्या प्रास्ताविकात राजेश नायडू यांनी पाहुण्यांना आणि श्रोत्यांना सांगितले की हॅलो चंद्रपूर 1998 मध्ये कसे सुरू झाले आणि काही अपरिहार्य कारणांमुळे 2002 मध्ये बंद करावे लागले. पण वृत्तक्षेत्राच्या निवडीमुळे त्यांना या क्षेत्रात पुन्हा येण्याची इच्छा होती आणि अखेर गेल्या वर्षी ९ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांनी पार्थशर न्यूज सुरू केले. त्यांनी सांगितले की, पहिल्या वर्षी आमचे चॅनल दीड लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. आमच्या बातम्यांना 5000 ते 25000 व्ह्यूज येत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की संपूर्ण विदर्भात त्यांचे वार्ताहर करण्यात आले आहेत. त्यांचे विदर्भाबाहेर ठाणे, नवी मुंबई येथे काम करणारे वार्ताहर आहे.या वर्षी लवकरच मुंबईत त्यांचे कार्यालय सुरु करण्याची त्यांची पूर्ण योजना आहे. एवढेच नाही तर 2 वर्षात ही वाहिनी उपग्रह वाहिनी करण्याचा त्यांचा प्रयत्न असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
हे चॅनल केवळ भारतातच नाही तर मध्य पूर्व आणि अमेरिकेतील 5, 6 देशांमध्ये श्राेते पाहत आहे. त्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितीतांचे आभार प्रतिभा नायडू यांनी मानले. आयोजित या समारंभाला अनेक मान्यवर मंडळी उपस्थित हाेती.
अनेक मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत चंद्रपूर नगरीत पार पडला मोठया थाटात गौरव व चंद्रपूर रत्न पुरस्कार वितरण समारंभ !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 15, 2022
Rating:
