सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
गणेशपूर शेत शिवारातील वीज प्रवाह बंद असलेल्या व विद्युत डीपी बसवून असलेल्या वीज खांबाला लक्ष करून चोरट्यांनी ०.१ स्क्वेयर मिली मीटरची जर्मनची विजेची तार चोरून नेली. ६६ केव्ही वीज प्रवाह क्षमता असलेली विजेच्या खांबावरील ही जर्मनची तार १ किमी लांब व २८० किलो वजनाची होती. लोखंडी वीज खांबाचेही या चोरट्यांनी कटरने कापून १४ तुकडे केले. विजेचे खांब कापले गेल्याने विद्युत विभागाचे ५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून २० हजार रुपये किमतीची जर्मनची विजेची तार चोरट्यांनी चोरून नेली. लाईनमनच्या ही बाब वेळीच लक्षात आल्याने इतर विजेची उपकरणे चोरी जाण्यापासून वाचली. वीज खांबावरील या डीपीचा विद्युत प्रवाह बंद असून वीज प्रवाह बंद असलेल्या विद्युत तारा व लोखंडी खांबांना चोरट्यांनी लक्ष करणे सुरु केले आहे. याबाबत महापारेषण उपविभाग यवतमाळचे लाईनमन सुनिल वसंतराव राऊत (४५) यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि च्या कलम ३७९, ४२७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.
विद्युत प्रवाह बंद असलेल्या वीज खांबांना कापून चोरट्यांनी जर्मनची विजेची तार केली लंपास
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 27, 2022
Rating:
