अवैध गाैण खनिजावर दंडात्मक कारवाया करण्यासाठी मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे, प्रकाश सुर्वे व रमेश आवारींनी कसली कंबर!
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर: जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने काही रेती घाटाचे लिलाव झाले तर काही घाटाचे लिलाव अद्यापही हाेणे शिल्लक आहे.प्रशासनाचे वतीने जिल्ह्याच्या ब-याच भागात महसुल विभागाचे फिरते पथक कार्यरत आहे. या शिवाय जिल्हा खनिकर्म विभागाची टीम गुप्त माहितीच्या आधारे जिव धाेक्यात टाकून दिवस रात्र अवैध वाहनांवर कारवाया करीत असल्याचे दिसुन येते.
जिल्ह्याभरात एवढ्या माेठ्या प्रमाणात कारवाया सुरु असतांना देखिल रेती तस्कर रात्रीचा फायदा घेत व महसुल विभागाच्या पथकाची नजर चुकवून हिंमतीने वाहनाव्दारे अवैध रेती आणित असल्याचे दिसून येते.काही भागात रेती तस्करांनी पथकावर व अधिका-यावर पाळत ठेवण्यासाठी राेजंदारीच्या व्यक्तिंची नेमणूक केली असल्याचे बाेलल्या जाते.परंतु त्यांनी किती ही रेती चाेरी साठी प्रयत्न जरी चालविले असले असले तरी जिल्ह्याच्या काेरपना भागातील मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे, गाेंडपिपरीचे मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे, घुग्घुसचे मंडळ अधिकारी किशाेर नवले, पडाेलीचे मंडळ अधिकारी विनाेद गणफाडे, राजूराचे मंडळ अधिकारी निरंजन गाेरे, जिल्हा खनिकर्म विभागातील अल्का खेडकर यांनी अवैध रेती तस्करांच्या वाहनांना पकडुन चांगलाच धडा शिकविला आहे तर चंद्रपूरचे मंडळ अधिकारी रमेश आवारी यांनी गुप्त माहितीच्या आधारे महसुल पथकास साेबत घेवून अवैध रेती माफियांच्या मुसक्या आवळण्याचे काम जाेरात सुरु केले आहे.
दरम्यान दि.२४ फेब्रुवारीला जुनाेना मार्गावरुन अवैध रेतीची वाहतुक करतांना एका वाहनास मंडळ अधिकारी आवारी, तलाठी संदेश सरपे, पिल्लई व येरमे यांनी पकडले.त्यांनी ही संयुक्तिकरित्या कारवाई करीत त्या वाहनाचा जप्ती नामा केला व त्या वाहनांस दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा केल्याचे व्रूत्त आहे. सध्याच्या परिस्थितीत पठाणपुरा व वढा हे अवैध रेती तस्करांचे केन्द्र बनले असल्याचे बाोलल्या जाते या कडे संबंधित मंडळ अधिका-यांनी व त्यांचे महसुल पथकांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाया कराव्या अशी जनतेंकडुन सातत्याने मागणी हाेत आहे. विशेषता खनिकर्म विभागाने या कडे जातीने लक्ष पुरविल्यास अनेक रेती तस्करांचे (अवैध गाैण) वाहने जाळ्यात अडकु शकते परिणामे शासनाला माेठ्या प्रमाणात दंडात्मक कारवायापाेटी महसुल मिळू शकते. जिल्ह्यात अवैध गाैण खनिज प्रकरणात काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे, प्रकाश सुर्वे यांनी जिवाची पर्वा न करता दिवस रात्र पथकास साेबत घेवून अवैध गाैण प्रकरणात ब-याच कारवाया केल्या आहे तर गडचांदुर हे औद्योगिक परिसर असून देखिल या ठिकाणी मंडळ अधिकारी नारायण चव्हाण यांचे कारवाया फारच अल्प असल्याचे कळते. अनेक मंडळ अधिकारी व त्यांचे पथक अवैध गाैण खनिज वाहने पकडण्यांसाठी खासगी वाहनांचा उपयाेग करीत असतात परंतु त्यांना शासनाकडुन त्या वाहनांचा किराया मिळत नसल्याची खंत जिल्ह्यातील अनेक मंडळ अधिका-यांनी बाेलून दाखवली.
शासनाचे वाहने वापरल्यास रेती तस्करांचे अवैध गाैण खनिज वाहने मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या कडे प्रशासनाने लक्ष देणे तेव्हढेच महत्वाचे व गरजेचे आहे.खराेखरचं जिल्हा प्रशासन त्यांचे या मागणीकडे लक्ष पुरवेल काय ?
अवैध गाैण खनिजावर दंडात्मक कारवाया करण्यासाठी मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे, प्रकाश सुर्वे व रमेश आवारींनी कसली कंबर!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 26, 2022
Rating:
