तालुक्यातील झोला येथे शिवसेना प्रणित युवासेनेच्या शाखेचे उद्घाटन, युवासेनेचा उपक्रम युवकांचे संघटन

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्याने शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी मोर्चेबांधणीला लागले असून पक्षीय बळ वाढविण्याकरिता गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक हा उपक्रम शिवसेनेने हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शिवसेना प्रणित युवासेनेने तालुक्यातील झोला या गावात युवासेनेची नवीन शाखा तयार केली असून नुकताच या शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडला. युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून वेगवेगळे उपक्रम राबवून अनेक सामाजिक प्रश्न व समस्यांना वाचा फोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पक्षांनी त्यांच्यावर टाकलेल्या जबाबदारीची जाणीव ठेऊन पदाला साजेशे कार्य करण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न राहिला आहे. आता त्यांनी पक्ष बांधणीला प्राधान्य देत, युवा वर्गाला संघटित करून गावांमध्ये युवासेनेच्या शाखा तयार करणे सुरु केले आहे. तालुक्यातील झोला येथे युवासेनेची कार्यकारणी गठीत करण्यात आली असून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी सह उद्घाटक म्हणून युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे व संजय देठे उपस्थित होते. संजय देरकर यांनी रिबीन कापून झोला येथील युवासेनेच्या शाखेचे उद्घाटन केले. यावेळी गावातील अनेक युवकांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शाखा उद्घाटन सोहळ्याला शिवसेनेचे डॉ. जगन जुनगरी, भगवान मोहिते, प्रविण खानझोडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. शिवसेना ते युवासेना पक्षबांधणीसाठी युवकांचे योगदान महत्वाचे असते, असे गौरव उद्गार यावेळी संजय देरकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला गावकऱ्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. युवासेनेच्या झोला शाखेचे शाखा प्रमुख म्हणून राजू मेश्राम यांची तर उपशाखा प्रमुख निलेश मूर्तिकार, सचिव अमोल सूर यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष बांधणीबद्दल महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. शाखा उद्घाटन सोहळ्याच्या यशस्वीतेकरिता रोहित घोडाम,लक्ष्मण घोडाम, हरी सुर, रवि मेश्राम, रोशन पढाल,गणेश मेश्राम,गजानन आत्राम,मंगेश आत्राम,पिंटू सुर,मिथुन मेश्राम,शुभम बावणे,मोहन ठाकरे,मयूर मूर्तिकर,आदित्य मूर्तिकर,देवानंद कनाके,गजानन कनाके,विजू रासेकर,शेखर मत्ते,दिनेश निंदेकर,सचिन मेश्राम,पिंटू तलांडे,सुरज मेश्राम,रुपेश मेश्राम,वैभव आंबेकर,अमोल बावणे यांनी सहकार्य केले.
तालुक्यातील झोला येथे शिवसेना प्रणित युवासेनेच्या शाखेचे उद्घाटन, युवासेनेचा उपक्रम युवकांचे संघटन तालुक्यातील झोला येथे शिवसेना प्रणित युवासेनेच्या शाखेचे उद्घाटन, युवासेनेचा उपक्रम युवकांचे संघटन Reviewed by सह्याद्री चौफेर on February 28, 2022 Rating: 5
Powered by Blogger.