शिपाई संवर्गातील पदाेन्नतीसाठी उर्वरीत असलेली १५ टक्के पदभरती तातडीने करा - चंद्रपूर जिल्हा काेतवाल संघटनेचीे मागणी !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : शिपाई संवर्गात पदाेन्नतीकरीता उर्वरीत असलेली १५ टक्के पदभरती तातडीने करा अश्या आशयाची मागणी महाराष्ट्र काेतवाल संघटना जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष प्रदिप मेश्राम, सचिव चिदानंद सिडाम, भूतपूर्व जिल्हाध्यक्ष उमेशकुमार अलाेणे, माजी राज्य संघटक प्रकाश चेपूरवार, कोषाध्यक्ष प्रशांत वाघमारे व अन्य पदाधिका-यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांचे कडे आज सोमवार दि.२८ फेब्रुवारीला एका लेखी निवेदनातुन केली आहे.

दरम्यान काेतवाल संघटनेच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यां साेबत या रास्त मागणी संदर्भात चर्चा देखिल केली असल्याचे समजते. काेतवालांचे मानधनात वाढ करण्याबाबत शासन निर्णय क्र.बैठक २०१६ / प्र.क.५८१ / ई-१० दि. ६\२\१९ नुसार महसुल विभागांतर्गत असणा-या गट 'ड' च्या प्रथम नियुक्तीच्या पदापैकी नियमित पदांमधुन ४० टक्के काेतवालांसाठी राखीव ठेवण्यात यावीत,सेवा प्रवेश नियमांमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यांत यावे असे नमुद करण्यांत आलेले आहे. त्याच अनुषंगाने सन २०२१ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील काेतवाल संवर्गातुन शिपाई संवर्गात पदाेन्नती करतांना ४० टक्के ऐवजी २५ टक्क्यानुसार पदाेन्नती करण्यांत आली आहे. अजून १५ टक्के पदभरती शिल्लक आहे. विशेष म्हणजे शिपाई पदाची अनेक पदे चंद्रपूर जिल्ह्यात शिल्लक असल्याचे जिल्हा काेतवाल संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याच संदर्भात एक निवेदन राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थाेरात यांना पाठविण्यात आले असल्याचे काेतवाल जिल्हा संघटना अध्यक्ष प्रदिप मेश्राम यांनी आज या प्रतिनिधीशी बाेलतांना एका भेटीत सांगितले.
शिपाई संवर्गातील पदाेन्नतीसाठी उर्वरीत असलेली १५ टक्के पदभरती तातडीने करा - चंद्रपूर जिल्हा काेतवाल संघटनेचीे मागणी ! शिपाई संवर्गातील पदाेन्नतीसाठी उर्वरीत असलेली १५ टक्के पदभरती तातडीने करा - चंद्रपूर जिल्हा काेतवाल संघटनेचीे मागणी ! Reviewed by सह्याद्री चौफेर on February 28, 2022 Rating: 5
Powered by Blogger.