सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश आले असून २३ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत तिन मोठ्या कामांना मंजूरी मिळाली आहे. यात वढा तिर्थक्षेत्र, संत जगनाडे महाराज समाधी स्थळ आणि ईरइ नदिचे सौदर्यीकरण आदि कामांचा समावेश असून १६८ कोटी रुपयांतून सदर क्षेत्रांचा विकास केल्या जाणार आहे.
विदर्भाचे पंढरपूर असलेल्या वढा तिर्थक्षेत्राला पर्यटनस्थळाचा दर्जा देत येथे विकास कामे करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून सातत्याने केली जात होती. याबाबत मुंबई स्तरावर त्यांचा पाठपूरावाही सुरु होता. तसेच संत जगनाडे महाराज यांच्या समाधी स्थळाचा विकास करण्यात यावा या करिताही आमदार किशोर जोरगेवार आग्रही होते. इरई नदीचे खोलिकरण करुन तेथे सौदर्यीकरण करण्यात यावे या करिताही आमदार जोरगेवार यांचा पत्रव्यवहार सुरु होता. अखेर आता सदरहु सर्व कामांसाठी मोठा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. काल २३ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत सदर कामांना मंजूरी देण्यात आली आहे. यात वढा तिथक्षेत्राचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्यासाठी ४४ कोटी, संत जगनाडे महाराज यांच्या समाधी स्थळाचा पर्यटन विकास करण्यासाठी ७४ कोटी तर चंद्रपूर शहरालगत असलेल्या ईरइ नदीच्या खोलीकरण, सौदर्यीकरण, आणि संवर्धनाकरिता ५० कोटी रुपयांचा निधी घोषीत करण्यात आला आहे. त्यामूळे आता लवकर सदरहु सर्व ठिकाणांची कायापलट होणार असून पर्यटनास वाव मिळणार आहे. सदरहु कामांसाठी मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही सातत्याने पाठपूरावा केला होता. हे कामे करण्यात यावी या करीता त्यांचेही प्रयत्न सुरु होते. त्यामूळे हे कामे मंजूर केल्याबदल आमदार जोरगेवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील विकास कामांना गती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 24, 2022
Rating:
