सह्याद्री न्यूज नेटवर्क |
किनवट : येथील गटविकास अधिकारी यांना दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली किनवट तालुका अध्यक्ष अंकुश राठोड, महीला अध्यक्ष बालीताई जागनेवाड, शिष्टमंडळ गटविकास अधिकारी व नायब तहसीलदार किनवट यांना भेटून निवेदनातील प्रश्नावर चर्चा करीत असता दोन्ही अधिकारी यांना ऊतर देता आले नाही.
आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले यावेळी डाकोरे पाटिल यांनी गटविकास अधिकारी यांना सात प्रश्न व तहसिलदार साहेब यांना नऊ प्रश्नाचे लेखी ऊतर दि 9 मार्च 22 पर्यंत दोन्ही कार्यालयाकडून निवेदनाद्वारे माहिती व हक्क खालील मागण्याची दखल न घेतल्यास दि 13 मार्च 22 पासुन जिल्हाधिकारी नांदेड येथे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली बेमुधत धरणे व आंदोलन करण्याचा इशारा दिला.
दिव्यांग बांधवाच्या मागणी असलेले प्रश्न पुढील प्रमाणे :
1) दिव्यांग मित्र अॅप नांदेड
दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या समाज कल्याण विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सुविधा दिव्यांगाला घरपोच मिळण्याकरीता दिव्यांग मित्र अॅप नांदेड ची निर्मिती नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री व माजी जिल्हाधिकारी नांदेड यांनी केली व एकही दिव्यांग वंचित राहू नये वेळेचे बंधन वेळापञक 14 जुलै ते 31 जुलै 20 नाव नोंदणी व दि .1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 20 पर्यंत छाननी व 15 ऑगस्ट 20 ला लाभ देण्याचे व एकहि दिव्यांग वंचित राहिल्यास कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आदेश दिले असता अठरा महिन्यात आपल्या तालुक्यात किती दिव्यांगाची दिव्यांग मिञ अँप मध्ये नोंदणी,मंजुरी,किती दिव्यांगाना लाभ दिला वरीष्ठाचे वेळापञक व आदेश न माननार्या अधिकारी यांच्यावर आपण काय कार्यवाही केली.त्याची यादीसहित माहिती त्वरित देण्यात यावी.
2) दिव्यांग कायदा 2016 ची अंमलबजावणी दिव्यांग बांधवाना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे म्हणून त्यांना त्यांचे हक्क व अधिकार मिळावा म्हणून दिव्यांग हक्क 2016 च्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून आपल्या कार्यालयासहित किती ग्रामपंचायत ने दिव्यांगाच्या ग्रामसभा किंव्हा बैठकीत माहिती दिली त्यांची माहिती रजिस्टर सहित देण्यात यावी.
3) दिव्यांग साहित्य व पायाभूत साधने शिबीर
नांदेड जिल्ह्यातील डिसेंबर 2019 मध्ये दिव्यांगासाठी पायाभूत साधने व साहित्य मोजमाप शिबीराचे आयोजन करून लाखो रुपये खर्च करण्यात येऊन अनेक दिव्यांगाना साहित्य का मिळत नाही ते आज हि आपल्या पंचायत समिती का? पडुन आहे आज पर्यंत किती दिव्यांगाना वाटप केले किती देणे बाकी आहे त्याच्या कारणासहित लाभार्थी यादीसहित त्वरीत माहिती देण्यात यावी.
4) दिव्याग राखीव पाच टक्के निधी ग्रामपंचायत, व पंचायत समिती, येथे 2016 ते 2021 पर्यंत आज पर्यंत आपल्या तालुक्यातील किती ग्रामपंचायत व आपल्या कार्यालयातून किती वेळेस दिव्यांग निधी देण्यात आला त्या लाभार्थी रक्कमेसहित यादी देण्यात यावी. दिव्यांग पाच टक्के निधी दिला नसेल तर का देण्यात आला नाही ते कारणासहित माहिती त्वरित देण्यात यावी.
5) म.ग्रा.रो.ह.योजनेत दिव्यांगाला काम मिळेना
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दिव्यांगाला दरवर्षी किमान 100 दिवस गावातच रोजगार देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आपल्या तालुक्यातील किती गावात दिव्यांगाना काम किंव्हा बेरोजगार बता देण्यात आला किंव्हा नाही दिला तर त्यांचे कारणासहित दिव्यांग लाभार्थी यादीसहित माहिती देण्यात यावी.
6) दिव्यांगाला स्वयंरोज गारासाठी जागा
गावातील शासकिय व निमशासकीय कार्यालयात व कार्यालयीन परिसरात दिव्यांगाला स्वयं रोजगारासाठी 200 स्केअर फुट जागा देण्याबाबत शासन निर्णय व परिपत्रक काढण्यात आले आहे. आपल्या कार्यालयासहित किती ग्रामपंचायत ने दिव्यांगाना जागा देऊन किती दिव्यांगाना आधार दिला जर दिला नसेल तर कारणासहित लाभार्थी यादीसहित माहिती त्वरीत देण्यात यावी.
7) दिव्यांग बांधवाना घरकुल योजनेत प्राधान्य म्हणून पाच टक्के प्रमाणे घरकुल आपल्या तालुक्यात किती गावात दिव्यांगाना लाभ देण्यात आला व नाही दिला तर त्यांच्या कारणासहीत लाभार्थी यादी देण्यात यावी.
यावेळी दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, तालुका अध्यक्ष अंकुश राठोड, सचिव गणेश जाधव, महीला अध्यक्ष बालीताई जानगेनवाड, आनंदराव मेश्राम, गजानन लामसोंगे, देवराव आञाम, पायल आडे छाया वानखेडे, गोंविद वाकोडे, शेख गौस, देवानंद सोनकांबळे ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
दिव्यांग बांधवाच्या विविध मागण्यासाठी चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिले गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 24, 2022
Rating:
