अचानक सोन्याला आली चकाकी, सोन्याच्या भावात झाली मोठी वाढ, एकाच दिवसात दोन हजार रुपयांनी वाढलं सोनं

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : सोन्याच्या भावात आज अचानक मोठी वाढ झाल्याने येणाऱ्या काही दिवसांत सोन्याचे दर गगनाला भिडतील ही चर्चा शहरात पसरल्याने नागरिकांनी सोने खरेदी करण्याकरिता सोने चांदीच्या दुकानात एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. आठ ते दहा दिवसांत सोन्याचा भाव मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे सूतोवाच आज शहरातील सोना चांदीच्या दुकानदारांकडून ऐकायला मिळाले. सोन्याचे भाव भरमसाठ वाढणार असल्याच्या चर्चेने शहरात वादळ उठल्याने सोने खरेदी करण्याकरिता नागरिकांनी आज सोनाचांदीच्या दुकानांची वाट धरली. युक्रेन व रशिया मध्ये युद्ध छेडल्याचा संदर्भ या अचानक झालेल्या घसघशीत वाढीला दिला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत सोन्याच्या भावात मोठी वाढ झाल्यास सोने खरेदी करतांना आर्थिक भुर्दंड बसू नये म्हणून नागरिकांनी ज्वेलर्समध्ये चांगलीच गर्दी केली. लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने या काळात सोन्याला मोठी मागणी असते. सोने खरेदी शिवाय लग्नच पूर्ण होत नसल्याने वाढणाऱ्या किमती लक्षात घेता आधीच सोने खरेदी करून ठेवलेले बरे, या कल्पलकतेतून आज शहरात सोने खरेदीला उधाण आले. सोन्याचे भाव एकाच दिवसात ५३ हजार ८०० रुपये प्रति तोळा झाल्याने सोन्याचे भाव वधारणार असल्याची चर्चा शहरात पसरली. आठ ते दहा दिवसांत सोने ५५ हजाराचा टप्पा पार करेल, ही शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकही सोने खरेदीवर तुटून पडले. १५ दिवसांआधी ५० हजार रुपये तोळा असलेलं सोनं मागच्या आठवड्यात ५१ हजार ८०० रुपये पर्यंत वाढलं. आज अचानक सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. ५१ हजार ८०० रुपये प्रति तोळा असलेलं सोनं सकाळी ५२ हजार ८०० रुपये व दुपार नंतर लगेच ५३ हजार ८०० रुपये प्रति तोळा पर्यंत वृद्धावलं. अशीच सोन्याच्या भावात वाढ झाल्यास येणाऱ्या काही दिवसांत सोन्याचे भाव गगनाला भिडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अचानक सोन्याला आली चकाकी, सोन्याच्या भावात झाली मोठी वाढ, एकाच दिवसात दोन हजार रुपयांनी वाढलं सोनं अचानक सोन्याला आली चकाकी, सोन्याच्या भावात झाली मोठी वाढ, एकाच दिवसात दोन हजार रुपयांनी वाढलं सोनं Reviewed by सह्याद्री चौफेर on February 24, 2022 Rating: 5
Powered by Blogger.