सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
वैभव मारोती वैद्य (२८) असे गळफास घेऊन आत्महत्या केले लेल्या मृतकाचे नाव आहे. गेल्या वर्षीच त्याचे लग्न झाले होते. वैभव ची पत्नी गर्भवती होती. ती प्रसूतीसाठी माहेरी गेली होती. आज (ता.२४) गुरुवारी रोजी सकाळी मृतक वैभव हा शेतात कामाला गेला होता. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास तो घरी परत आला होता. घरी कुणीच नसल्याची संधी साधून त्याने घराच्या सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. सव्वा सात च्या जवळपास ही घटना वैद्य कुटुंबीयांच्या लक्षात आली. पोलीस पाटीलांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्याच्या पश्चात आई,वडील आणि पत्नी असा परिवार आहे. वैभवने आत्महत्या का केली सध्या तरी कारण समजू शकले नाही.
घटनेचा तपास पोलीस करीत आहे.
विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, सिंधी येथील घटना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 24, 2022
Rating:
