सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : दिवस रात्र सुरु असलेल्या अवैध गाैण खनिजावर अंकुश व दंडात्मक कारवाया करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या अति दुर्गम भागातील काेरपना महसुल विभागाच्या पथकाने कंबर कसली असून नित्य नेमाने धडक कारवाया सुरु आहे.
या आधी काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे व महिला तलाठी रोशनी काेल्हे या शिवाय तलाठी अमाेल गाेसाई, विरेन्द्र मडावी, विशाल काेसनकर यांनी अवैध गाैण खनिज प्रकरणात धडक कारवाया केल्या आहे .अश्यातच आज शुक्रवार दि.२५ फेब्रुवारीला पहाटे ३ वाजताच्या सुमारास परसोडा येथून अवैध रेती वाहतूक करणारे पंकज बावणे रा. कोरपना यांचे ट्रॅक्टर पकडण्यात आले असुन त्या वाहनाचा क्र.MH34AP3599 असा आहे हे वाहन अवैध रेती वाहतूक करीत असताना पथकास पहाटेला मिळाले. वाहन चालका कडे कोणताच रेती वाहतुकीचा परवाना नव्हता. रेती वाहनाचा जप्ती करून ते ट्रॅक्टर दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालय येथे लगेच जमा करण्यात आले. उपराेक्त कारवाई काेरपनाचे तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यांत आली.
या महसुल पथकात प्रामुख्याने गडचांदुरचे मंडळ अधिकारी नारायण चव्हाण,काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, तलाठी नामदेव मेश्राम, प्रदीप जाधव यांचा सहभाग आहे. सातत्याने महसुल विभागाच्या अवैध गाैण खनिज प्रकरणात या भागात धडक कारवाया सुरु आहे. हे विशेष! काल गुरुवारी गडचांदूरचे मंडळ अधिकारी नारायण चव्हाण यांनी आवाळपूर बसस्टँड परिसरात अवैध मुरुमाचे एक वाहन पकडले.
सदरहु वाहन राजेन्द्र महादेव खेडेकर यांचे मालकीचे असल्याचे समजते.रात्रीच्या वेळेस काेरपना या भागात अवैध गाैण खनिज वाहतुक सुरु असुन महसुल पथकाच्याही कारवाया सातत्याने सुरु आहे.
काेरपना महसुल पथकाची पहाटेला कारवाई -अवैध रेती वाहनाला पकडले !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 25, 2022
Rating:
