सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव : तालुक्यातील सालेभट्टी शिवाराला लागुन असलेले फिस्की च्या जंगल परिसरात वाघाने हल्ला करून एका गायीला ठार केले.
सालेभट्टी येथील तुळशीराम लोनसावडे यांचे पशुधन बुधवारी चराई ला शिवारात गेली. रात्री ती परत न आल्यामुळे त्यांनी रात्रीच खूप शोध घेतला. परंतु तीचा शोध लागला नाही. गुरुवारी (ता. २४) पहाटेच्या सुमारास सालेभट्टी शिवारात फिस्कीच्या जंगलात पट्टेदार वाघ व त्याच्या बाजूला मृत गाय आढळून आली.
वाघाला पाहून तो घाबरून परत गावाकडे आला. गावातील काही लोकांना घेऊन पुन्हा त्या घटनास्थळी पोहोचला. दिवस उजाडला असल्यामुळे वाघ तेथून पसार झाला होता.
या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.
वाघाने पाडला गायी चा फडशा, फिस्की जंगल परिसरातील घटना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 24, 2022
Rating:
