डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथ संपदा प्रत्येकाने वाचली पाहीजे - शिवा प्रधान


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

अमरावती : येथील बौध्द उपासक संघ भिमटेकडी,परीसर अमरावतीच्या वतीने आयोजीत संडे मिशनचा कार्यक्रम नुकताच सपन्न झाला. 
कार्यक्रमाच्या प्रारंभी बौध्द उपासक संघाचे अध्यक्ष मा शिवा प्रधान यांचे हस्ते व प्रमुख अतिथी मा प्रभाकर गवई या मान्यवरांनी दिप प्रज्वलन करुन भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागथ भगवान गौतम बुध्द यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन केले.

बुध्द वंदना सामुहीक घेण्यात आली तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आदराणीय अशोकराव झटाले यांच्या निधनाबद्दल त्यांना सामूहीक आदरांजली देण्यात आली. तदनंतर मंचावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. 
कार्यक्रमा चे प्रास्ताविक ऊपासक संघाचे कोषाध्यक्ष मा गंगाधरराव ईंगळे यांनी केले सदर कार्यक्रमामध्ये मा संजय बनसोड संचालक शासकीय ग्रंथालय महाराष्ट्र शासन मुंबई यांनी अभ्यासीकेच्या विद्यार्थ्याना स्टेज डेअरींग यावे या करीता त्यांचा समन्वय असावा असे कार्यक्रमात सांगितले. 

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष,बौध्द उपासक संघाचे अध्यक्ष, आंबेडकरी विचारवंत मा शिवा प्रधान अध्यक्षीय भाषणात बोलतांना ते म्हणाले की आजच्या दिवसी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस आणि गांधी,यांनी अस्पृश्यतेबाबत काय केले हा ग्रंथ लिखानास प्रारंभ केला तो हा ऐतिहासिक दिवस होय डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथ संपदा खुप विपूल आहे, ती मानवाच्या ती सर्वहारा मानव मुक्तीचे सुक्त उजागर करणारी आहे. महात्मा गांधी आणि काँग्रेस अस्पृश्यांना यांनी अस्पृश्य संदर्भात काय कार्य केले कसाकसा बाबासाहेबांना विरोध झाला स्वतंञ्य मतदार संघ ईग्रजांशी गांधीचा पञव्यवहार त्यांच्या शिफारसी हा असा तत्काळातला शिरस्ता आहे माञ, बाबासाहेबांनी स्वातंञ्य समता बंधूता यांची कास धरत न्यायाची व राष्ट्राची एकात्म भूमीका घेवून कार्य केले बाबासाहेबांची कार्यप्रणाली समतेच्या अधिष्ठानावर आरुढ आहे बाबासाहेबांनी विविध ग्रंथ लिहून तमाम भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला तत्वज्ञानाची अनमोल संजीवनी दिली आहे. एक सत्याचा वैचारिक वारसा दिलेला आहे माञ, तो सर्वानी वाचणे गरजेचा आहे. बाबासाहेबांना समजून घेतांना त्यांची ग्रंथ संपदा प्रत्येकाने वाचली पाहीजे त्यामूळे बाबासाहेबांचे मनोहारी विचार सौंदर्य प्रत्येकाला मोहित केल्याशिवाय राहत नाही बाबासाहेबांच्या विचारातील सामाजीक तत्वे यांचा विचार करून समाजात एकसंघता कशी राहील या बाबीकडे सर्व जातीधर्माच्या पलीकडे जावून राष्ट्र हीत जपणे सुध्दा महत्वाचे आहे. त्यामूऴे संविधानात याची विचार सरणी अंतःर्भूत आहे तीला आपण सर्वजण मिळून जपूया आजच्या दिनाचा संकल्प धरुया असे मौलिक प्रतिपादन "संडे मिशन" या बौध्द उपासक संघाच्या कार्यक्रमात केले आहे.
या प्रसंगी उपासक संघाचे सदस्य मा प्रभाकरराव गवई व शरद सोनोनो यांच्या वाढदिवस प्रित्यर्थ त्यांना मा शिवा प्रधान यांचे हस्ते पुष्पगुच्छ व ग्रंथ त्यांना देवून अभिष्टचींतनपर सदीच्छा दिल्या, कार्यक्रमाचे सुञ संचालन आयू ज्योती बोरकर यांनी केले, आभार प्रदर्शन आयु डी के बागडे यांनी केले. 

सदर कार्यक्रमात प्रामूख्याने उपस्थितामध्ये आयु डी जी वानखडे, आयु एस बी खोब्रागडे, नामदेवराव वाघमारे, सूर्यभान बनसोड, सुधाकर राउत, प्रभाकर गवई, शरद सोनोने, अवधूत गजभीये, गोपाळ रामटेके, नलीनी नागदिवे, प्रतिभा प्रधान, अनिता रोडगे, प्रभाकर गाडगे, वर्षा गाडगे, गंगाधर ईंगळे, बापूराव गुळसुंदरे, व्यंकट खोब्रागडे, अस्मीता सोमकुवर, माला चव्हान, ज्योती बोरकर, डी के बागडे, प्राजक्ता सोमकुवर आदी उपस्थिती होती, बराच वेळ चाललेल्या या कार्यक्रमाची सांगता भिक्खूणी प्रजापती यांच्या आशिर्वाद गाथेने संपन्न झाली. अशी माहिती सहसचिव नामदेवराव वाघमारे यांनी दिली.
 
डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथ संपदा प्रत्येकाने वाचली पाहीजे - शिवा प्रधान डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथ संपदा प्रत्येकाने वाचली पाहीजे - शिवा प्रधान Reviewed by सह्याद्री चौफेर on February 24, 2022 Rating: 5
Powered by Blogger.