टॉप बातम्या

राळेगाव : शिवजयंती निमित्य मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी व वितरण - अमित ढोबळे यांचा अभिनव उपक्रम


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

राळेगाव : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रहार संघटनेचे अमित ढोबळे यांच्या मार्फत सावरखेड येथील मोफत ई-श्रम कार्ड वाटप करून शिवजयंती साजरी करण्यात आली.

यावेळी बोलतांना गावातील सर्व समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नरत राहील असे प्रहारचे अमित ढोबळे यांनी गावकऱ्यांना ग्वाही दिली. राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या विचाराने अमित ढोबळे यांनी आपल्या परिसरात मोठ्या उत्साहाने काम चालू केले आहे. गावातील समस्याचे प्रशासन दरबारी मांडत त्या मार्गी लावण्य्साठी नेहमी पाठपुरावा करत असतात. गावातील सर्व संघटीत कामगारांनी ई - श्रम कार्ड नोंदणी केली तसेच त्यांना कार्डचे वितरणही करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे उद्घाटन निलेश रोठे माजी सभापती पं.स राळेगाव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राहुल चिघघाटे, निलेश पिंपरे, मंगेश आत्राम, मोहन जुनघरे, काशिनाथ टेकाम, आकाश ढोबळे, मुकेश आत्राम, सुधाकर मेश्राम, स्वप्नील तोडासे, विनोद जुनघरे, साईनाथ टेकाम, दिलीप,  अनिल निंबादेवी, श्रीकांत ढोबळे, सुरेश जुनघरे तसेच इतर प्रहार सेवक उपस्थित होते.
Previous Post Next Post