महसूल विभागाची धडक कारवाई, अवैध रेती वाहणारे ट्रॅक्टर जप्त

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर,  राजूराचे एसडीआे संपत खलाटे व काेरपनाचे तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांचे मार्गदर्शनाखाली काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांनी व त्यांचे महसुल पथकांनी स्वताच्या प्राणाची पर्वा न करता आज गुरुवार दि.२४ फेब्रुवारीला भल्या पहाटे गुप्त माहितीच्या आधारे अवैध रेतीची वाहने पकडल्याचे नुकतेच वृत्त प्राप्त झाले आहे. ही अवैध रेतीची ट्रॅक्टर पकडण्यासाठी मंडळ अधिकारी पचारे व त्यांचे महसुल पथकांस अख्खी रात्र जागुन काढावी लागली असल्याचे बाेलल्या जाते.

 गेल्या काही दिवसांपासून पैनगंगा नदीच्या पात्रातुन रेती तस्करांनी महसुल विभागाच्या पथकाची नजर चुकवून व पाळत ठेवून वाहनाव्दारे रेती नेण्यांचा सपाटा लावला हाेता. या बाबत मंडळ अधिकारी पचारे यांनी या बाबतीत सर्व माहिती घेत अश्या अवैध गाैण खनिज वाहनांना पकडण्यांची जाेरदार माेहिम सुरु केली आहे. ब-याच वाहनांना महसुल पथकाच्या सहाय्याने पकडुन त्या वाहनांना दंडात्मक कारवायांसाठी तहसील कार्यालयात जमा केले आहे. वाहने पकडल्या जावू नये या साठी रेती तस्करांनी पाळत ठेवणारे राेजंदारीचे व्यक्ती या भागात ठेवले जरी असले तरी पचारे यांचे कारवाया मात्र तेवढ्याच जाेमात सुरु आहे.या भागात नित्य अवैध गाैण खनिज वाहने (वेळ प्रसंगी जीव धाेक्यात) टाकुन पकडल्या जात आहे. मुजाेर रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यांचे काम काेरपना महसुल पथक करीत आहे. त्यामुळे अवैध रेती तस्करांचे अक्षरश: धाबे दणाणले आहे तर शासनाच्या तिजाेरीत दंडात्मक कारवायापाेटी माेठा प्रमाणात महसुल जमा हाेत आहे.दरम्यान आज पहाटेला ४ वाजता अनिल मधुकर चांदेकर व मिथुन एलय्या पवार यांचे मालकीचे असलेले अवैध रेतींची वाहने मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे, पटवारी विरेन्द्र मडावी, प्रभाकर कुळमेथे, रुपेश पाहनपटे, सुरेश नागाेशे यांनी पाठलाग करुन पकडली सदरहु पकडलेल्या वाहनांची माहिती पचारे यांनी तात्काळ तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांना देतांच त्यांनी ती वाहने तात्काळ जप्तीनामा करुन तहसील कार्यालयात जमा करण्यांस सुचित केले. याच अवैध रेती प्रकरणात काेरपनाचा रेती तस्कर अनिल चांदेकर यांचे ट्रॅक्टर पकडण्यांत आले असुन त्याने या पुर्वी अनेकदा याच भागातुन अवैध रेती वाहनाव्दारे नेली असल्याची या परिसरात चर्चा आहे. प्रथमच त्याचे अवैध रेतीचे वाहन महसुल पथकाच्या जाळ्यात अडकले.अनेकदा याच चांदेकरने अवैध रेती तस्करांच्या बाबतीत ताेंडी तक्रारी वरिष्ठांकडे केल्या असल्याचे बाेलल्या जाते. आजच्या कारवाया करतांना ही अवैध वाहने पळून जाण्याच्या बेतात असतांना महसुल पथकाने पाठलाग करुन पकडली. महसुल पथकास या वेळी धमकविण्याचा प्रकार देखिल रेती वाहतुकदारांकडुन केला गेला असल्याचे विश्वासनिय सुत्राने प्रतिनिधीस सांगितले. सदरहु वाहन चालकाजवळ वाहन परवाना नसल्याचे समजते.

या भागातील अनेक गावात शेती उपयोगी परवाना असणारे ट्रॅक्टर आता अवैध रेती वाहतुकीत गुंतली असल्याचे एकंदरीत दिसते.
महसूल विभागाची धडक कारवाई, अवैध रेती वाहणारे ट्रॅक्टर जप्त महसूल विभागाची धडक कारवाई, अवैध रेती वाहणारे ट्रॅक्टर जप्त Reviewed by सह्याद्री चौफेर on February 24, 2022 Rating: 5
Powered by Blogger.