सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी जामणी : असंघटित कष्टकऱ्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी, श्रमजीवींना सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी तसेच सरकारकडून राबविल्या जाणार्या विविध योजनांचा लाभ कष्टकऱ्यांना मिळावा यासाठी झरी जामणी तालुक्यातील दिग्रस ग्रापमपंचायतीचे सरपंच तथा सरपंच सेवा संघाचे तालुका अध्यक्ष निलेश येल्टीवार यांनी असंघटित कामगारांची ई-श्रम कार्ड नोंदणी निःशुल्क करून दिली.
लहान व सिमांत शेतकरी, शेतमजूर, सुतार, कुंभार, न्हावी, पशुपालन करणारे, रस्त्यावरचे विक्रेते, बांधकाम कामगार, दुध उत्पादक, लेदर कामगार, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, ऑटो चालक, गवंडी, लोहार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन व ईतर श्रमजीवी काम करणाऱ्या कामगारांना कामाच्या मोबदल्या व्यतिरिक्त कोणतेही लाभ मिळत नाहीत. त्यांनाही सामाजिक सुरक्षा मिळावी व विमा योजनांचा लाभ मिळावा याकरीता सरपंच निलेश येल्टीवार यांनी त्यांच्या दिग्रस गावात ई-श्रम कार्ड नोंदणीच्या माध्यमातून असंघटित कामगारांना संघटीत केले.
दिग्रस येथे मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी शिबीर संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 24, 2022
Rating:
