सह्याद्री न्यूज नेटवर्क |
नागपूर : उपराजधानी नागपूरातील संताजी ब्रिगेड तेली महासभाचे काम उल्लेखनिय व वाखाण्याजाेगे असल्याचे मत ए.आय.सी.सी. नॅशनल काे - ऑर्डीनेटर प्रदेशच्या कार्यकारी अध्यक्षा संगिताताई तलमले यांनी व्यक्त केले.
संस्थेचे संस्थापक व सचिव अजय धाेपटे यांनी अथक परिश्रम घेवून त्यांनी या संस्थेला पुढे नेण्याचा आटाेकाट प्रयत्न केला ताे खराेखरचं अभिनंदनिय काैतुकास्पद असल्याच्या त्या पुढे म्हणाल्या. नागपूरातील जवाहर विध्यार्थी गृहात काल शनिवार दि.२६ फेब्रुवारीला आयोजित केलेल्या भव्य महिला मेळावा तथा विनामुल्य आराेग्य शिबिर उद्घाटनाच्या निमित्ताने त्या बाेलत हाेत्या. या वेळी उपस्थित महिलांना संगिताताई तलमले यांनी माेलाचे मार्गदर्शन केले. सदरहु आयाेजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रमेशजी गिरडे यांनी विभूषित केले हाेते. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने वेळी एका पथनाट्याचे आयोजन करण्यात आले हाेते. पार पडलेल्या या पथनाट्यातील कलावंताची अनेकांनी प्रशंसा केली. या वेळी एका रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीराचे आयोजन देखिल करण्यात आले हाेते. अनेकांनी या शिबिराचा लाभ घेतला असल्याचे आयाेजकानी आमच्या प्रतिनिधीशी बाेलतांना सांगितले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाजी खापर्डे, माजी महापाैर शेखर सावरबांधे, कामठीचे आमदार राधेश्याम हटवार, मनपा नागपूरच्या उपमहापाैर मनिषाताई धावडे, कन्हान नगर परिषदेच्या नगराध्यक्षा करुणा आष्टनकर, पारशिवणी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रतिभा कुंभलकर मंगला गवरे, कल्पनाताई कुंभलकर ,रेखा साकोरे, वंदना भुरे, समिता चकोले, अभिरुची राजगिरे, वंदना चांदेकर, जयश्री वाडीभस्मे, कुसुम बावनकर, शिला कामडे नंदा लोहबरे, मनपा माजी नगरसेविका नयना झाडे, प्रामुख्याने उपस्थित हाेत्या. कार्यक्रमाचे संचालन चित्रा माकडे यांनी केले. संताजी ब्रिगेड तेली समाज महासभाच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय धाेपटे, विजय हटवार, हितेश बावणकुळे, रुपेश तेलमासरे, गजानन तळवेकर, मंगेश साखरकर, कुमार बावणकर, आदींनी अथक परिश्रम घेतले.
आयोजित उपराेक्त कार्यक्रमाला महिला व तरुणींची उपस्थिती लक्षणिय हाेती.
संताजी ब्रिगेडचे काम वाखाण्याजाेगे व काैतुकास्पद - संगिताताई तलमले
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 27, 2022
Rating:
