शालेय विद्यार्थ्यांना सवलत द्या - अखिल भारतीय संविधानिक हक्क परिषदची मागणी

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता आकारण्यात येणाऱ्या प्रवास शुल्कात पन्नास टक्के घट करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी संविधानिक हक्क परिषद ने वाहतूक विभागाकडे निवेदनातून केली आहे.

कोरोना मुळे शाळा-कॉलेज बंद होते. आता मात्र, शाळा सुरु झाल्याने विद्यार्थी शाळा व ट्युशन क्लासेस करिता ग्रामीण भागातून शहरात येरजाऱ्या करतात. मात्र, फायदा घेऊन खासगी प्रवासी चालक त्यांच्याकडून अतिरिक्त तिकिटाचे दर वसुल करीत आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून यात सवलत देण्यात यावी अशी मागणी संतोष आत्राम, काजल मेश्राम, खुशबू तेलतुंबडे, स्टेलीन घोष, प्रगती कडू, जया राजूरकर, साक्षी श्रीवास्तव, अंजु चव्हाण व विद्यार्थ्यांनी केली आहे.
शालेय विद्यार्थ्यांना सवलत द्या - अखिल भारतीय संविधानिक हक्क परिषदची मागणी शालेय विद्यार्थ्यांना सवलत द्या - अखिल भारतीय संविधानिक हक्क परिषदची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on February 28, 2022 Rating: 5
Powered by Blogger.