सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
काल २७ फेब्रुवारीला या पोलियो लसीकरण मोहिमेंतर्गत तालुक्यातील ए.सी.सी. सिंदोला माईन्स येथील ऑक्युपेशनल हेल्थ सेंटर येथे पोलियो लसीकरण शिबीर घेऊन ३५ ते ४० चिमुकल्यांना पोलियोचे डोज देण्यात आले. सिंदोला माईन्स, हनुमान नगर व येणक या गावातील जनतेने या शिबराचा लाभ घेऊन आपल्या मुलांना पोलियोचे लसीकरण करवून घेतले. पोलियो लसीकरणाबाबत विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत असली तरी स्थानिक पातळीवर आरोग्य विभागाकडून आरोग्य सेवक व सेविकांमार्फत गावागावात लसीकरण मोहीम राबवावी लागते. लसीकरणाकरिता नागरिकांना प्रोत्साहित करावे लागते. एस.सी.सी. सिंदोला माईन्स येथे ऑक्युपेशनल हेल्थ सेंटरच्या माध्यमातून पोलियो लसीकरण मोहीम राबविण्यात आली. हेल्थ सर्विसच्या जी.डी.एम. डॉ. अपर्णा झवेरी व ए.सी.सी. सिमेंटचे जनरल मॅनेजर सुरेश वांढरे यांच्या मार्गदर्शनात ही पोलियो लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
या लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेकरिता अंगणवाडी सेविका सुनिता पाटिल, आशा सेविका निशा रामटेके, मदतनीस दुर्गा गेडाम, ओ.एच.सी. एसीसी स्टाफ नर्स मंदा चंदनखेडे, ओ.एच.सी. फार्मासिस्ट वैभव उपाध्ये आदींनी परिश्रम घेतले.
सिंदोला माईन्स येथे लसीकरण मोहीम राबवून ४० चिमुकल्यांचे केले पोलियो लसीकरण
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 28, 2022
Rating:
