सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
अमरावती : बौध्द उपासक संघ भिमटेकडी परिसर ,अमरावती द्वारा एकशे चोवीसाव्या माता रमाई जंयतीचा कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी बौध्द उपासक संघाचे अध्यक्ष मा जेष्ठ आंबेडकरी विचारवंत शिवा प्रधान हे होते
प्रारंभी भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतीमेला प्रमूख अतिथी तथा व्याख्यात्या आयु धम्मचारीणी,आर्यश्री मॅडम यांचे हस्ते प्रतीमेला माल्यार्पण करण्यात आले तसेच माता रमाई यांच्या प्रतीमेला मा शिवा प्रधान यांचे हस्ते माल्यार्पन करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात येवून आदर्शांना अभिवादन करण्यात आले.
प्रसंगी उपासक गोसावी यांनी सामूहिक बुध्द वंदना घेतली रमाई जयंती या मंचावर आसनस्थ असलेल्या मान्यवरांना उपासक संघाच्या वतीने पुष्पगूच्छ देवून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतीथी मा धम्मचारीणी आर्यश्री मॅडम यांचे स्वागत उपासक संघाच्या माजी संघटीका प्रतिभा प्रधान यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले तसेच मा डॉ कमल राउत सर प्रमुख अतीथी यांचे स्वागत एस बी खोब्रागडे माजी अध्यक्ष बौउस यांनी पुष्पगुच्ज देवून केले कार्यक्रमाचे अध्यक्ष मा शिवा प्रधान यांचे स्वागत उपासक संघाचे माजी सचीव मा बापूराव गुळसुंदरे यांनी केले
मंचकावर रमाईच्या प्रती भूमिकेत महाविद्यालयीन विद्यार्थीनी प्राची जवंजाळ हीने हुबेहुब प्रती रमाई साकारली ते या जयंती कार्यक्रमाच प्रमूख आकर्षन होते.
या प्रती रमाईचे स्वागत प्रतिभा प्रधान यांनी पुष्पगुच्छ देवून केले तसेच नलिनी नागदिवे,पुष्पा दंदे,ज्योती बोरकर यांनीही स्वागत केले.
प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमूख वक्त्या मा धम्मचारीणी आर्यश्री मॅडम आपल्या प्रमूख भाषणात म्हणाल्या की,रमाईचे बालपण अत्यंत हालअपेष्टेत गेले आणि नंतरचा जिवन प्रवास तर तो ही खडतर होता. कष्ट आणि त्याग याचे मूर्तिमंत उदाहरण हे रमाई पेक्षा कुणाचे असू शकत नाही माता रमाईचा ध्यास घेवून हरेक महीलेने आपले जिवन फुलवावे असे मौलीक प्रतीपादन त्यांनी प्रमूख व्याख्यात्या म्हणून जयंती कार्यक्रमात केले.
प्रसंगी डॉ कमल राउत सरांनी अतीथीपर भाषनात सांगीतले की रमाईचा त्याग आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समन्वयातून कार्याची विजयी शलाका गाठत रमाईचे ऋण हे कीती आहेत यांची प्रत्येकाने जाण ठेवली पाहीजे असे उद,बोधन डाँ कमल राउत यांनी केले.
कार्यक्रमात माजी अध्यक्ष मा एस बी खोब्रागडे यांनी ही रमाईच्या जीवनावरील कीस्से सांगून उपासकांना अंतःर्मूख केले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा शिवा प्रधान यांनी सांगीतले की, बाबासाहेबांच्या प्रत्येक कार्यात माता रमाईची साथ होती त्यामूळेच रमाबाई अत्यंत काळजीपूर्वक बाबांना जपत होती बाबासाहेबांना विजयाकडे नेत होती कर्नाटक धारवाड मधील डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेल्या वस्तीगृहात मुलांचे अन्नधान्य संपल्यामूळे मुलावर उपासमारीची पाळी आली तेंव्हा माञ रमाईला हे कळताच त्यांनी हातातील सोन्याच्या बांगड्या मोडून त्याचे अन्नधान्य आणायला लावून स्वतः भाकरी भाजी करुन विद्यार्थ्यांची भूक भागवीली. किती मोठे हे दातृत्व त्यांचे केवढे मोठे औदार्य होते हा दातृत्वाचा मोलाचा वाटा रमामातेचा होता. रमामातेने एकदा बाबासाहेबांना पंढरपूरला जाण्याची ईच्छा व्यक्त केली तेंव्हा बाबासाहेब म्हणाले की, रामू मी तुझ्यासाठी नवीन पंढरपूर वसवेन माञ ते पंढरपूर म्हणजे आताची नागपूरची दिक्षाभूमी होय अशा अनेक पैलूवर शिवा प्रधान यांनी भाष्य केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर नावाच्या वादळाशी रमाचा संसार हा खुपच त्यागाचा होता म्हणून रमा माता एक मूर्तीमंत सर्वस्वी त्याग करुणा शिलतेच प्रतीकच होत्या असे गौरवोद्गार शिवा प्रधान यांनी अध्यक्षीय भाषनात प्रतीपादन करतांना व्यक्त केले.
तदनंतर मा मीनाताई नागदीवे पञकार,यांनीही रमाई जयंतीदिनाच्या सर्व उपासक संघाच्या आला उपासकांना सदिच्छा दिल्या उपासक संघाच्या उपासीकेंनी रमाईवर कविता गीते सादर करुन कार्यक्रमाचा उस्साह वाढविला. त्यामधे रमाई माउली ही कविता प्रतीभा प्रधान यांनी तर अनीता जवंजाळ यांनी झोपडीवरची कविता सादर केली तसेच सुनिता रायबोले पुष्पा दंदे माला चव्हान,हिनल गाडगे यांनी चरणदास काळे यांनीही रमाई वरील गीत गावून उपासकांना मंञमुग्ध केले तसेच महादेव बागडे कवी यांनीही प्रबोधनाची कविता प्रस्तूत केली. डी के बागडे यांनीही गाणे सादर केले बराच वेळ चाललेल्या या जयंती कार्यक्रमाचे सुञसंचालन आयू ज्योती बोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन आयू बापूराव गुळसुंदरे यांनी केले.
कार्यक्रमाला उपासिकामधे आयू नलिनी नागदिवे, प्रतिभा प्रधान, अनिता जवजाळ, अनिता रोडगे, मीना नागदिवे, अस्मिता सोमकुवर, सविता भगत, वर्षा गाडगे, हिनल गाडगे, मेश्राम काकू, कोथळकर, ज्योती बोरकर, ज्योती गजभीए, तायडे, प्राजक्ता सोमकुवर, लता तायडे, उपासकामधे आयू नामदेवराव वाघमारे, रामकृष्ण तायडे, हिम्मत वरघट, आनंद ईंगळे, नरेश कांबळे, डी के बागडे, बोरकर गुरूजी, राहूल सोमकुवर, राहूल हिरकने, किशोर तायडे, अवधूत गजभीए, हंसराज रंगारी, चरणदास काळे, प्रभाकर गाडगे, नाखले काका, गोपाळ रामटेके, सूर्यभान बनसोड, विद्याधर जवंजाळ,भाउराव दहाट, एस बी खोब्रागडे, संजय घरडे आदिची उपस्थीती होती शेवटी रमाईच्याच गिताने कार्यक्रमाची सांगता झाली.
बौध्द उपासक संघ भिमटेकडी,परिसर,अमरावती द्वारा 124 व्या रमाई जयंतीचा कार्यक्रमसोत्साह सपंन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 08, 2022
Rating:
