कळंब येथे महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचा स्तुत्य उपक्रम


सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख

कळब : राळेगाव चौफुली येथे स्थित असलेल्या महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय प्रथम वर्धापन दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त उत्सव साजरा करण्यात आला.
 त्या निमित्ताने बिकट परिस्थितीवर मात करण्या साठी सावित्री आईचा वारसा घेऊन स्वतःचा उद्योग यशस्वीपणे उभारणाऱ्या कर्तृत्ववान उद्योजक महिलांचा सत्काराचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला या कार्यक्रमासाठी सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा सौ नंदिनी ताई खसाळे यांनी भूषविले.
शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीच सावित्री आज जगाची शिलेदार असा योग्य समज त्यांनी आधुनिक काळातील महिलांना दिला.

या प्रसंगी प्रस्ताविक डॉ सौ. माधुरी माणिक केवटे यांनी केली. त्या म्हणाल्या महामानवांना फक्त जयंती पुण्यतिथी पुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या विचारांना आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. स्त्री शिक्षणाचे सावित्री ज्योतीने लावलेले रोप गगनाला भिडावे यासाठी त्या सदैव प्रयत्नरत राहतात. या कार्यक्रमाचे आयोजन तसेच महात्मा फुले सार्वजनिक वाचनालया साठी त्यांनी स्वतःची जागा उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच तळागाळातील महिलांच्या उत्थानासाठी व शिक्षणासाठी त्या सतत झटत असतात. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तसेच महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष माननीय श्री मनोज भाऊ पद्माकर काळे हे होते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी तळमळीने मार्गदर्शन केले. ही अभिनव संकल्पनाही त्यांचीच होती. माननीय श्री विनोद भाऊ काळे यांनी परिस्थितीला न घाबरता स्वतःतील आत्मविश्वास वाढीस लावून आत्मनिर्भर व्हावे अशा शुभेच्छा सर्वांना दिल्या. माननीय श्री अंभोरे सरांनी सावित्री आईचा आदर्श घेण्याचे आवाहन उपस्थित बंधू-भगिनींना केले. बालकलाकारांनी सावित्री आईच्या जीवनावरील सुंदर अशा गीतपंक्ती सादर करून वातावरण भारावून टाकले होते.

या अभिनव कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी फिरोज काझी, चेतन भिसे, प्रवीण निमकर, संदीप वैद्य, दुर्गेश ठाकरे, सतीश मरापे, तुषार शेंडे, विलास गोरे, फुलकर सर, प्रतिभाताई मेत्रे, संध्या वाके, जया कठाळे, अश्विनी फाळके, कामडी भाऊ, तुषार आसुटकर, दिनेश वानखेडे, काळे भाऊ, धोबे भाऊ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता निमकर यांनी व आभार प्रदर्शन सपना ताई कोठारी यांनी केले.
कळंब येथे महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचा स्तुत्य उपक्रम कळंब येथे महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचा स्तुत्य उपक्रम Reviewed by सह्याद्री चौफेर on January 07, 2022 Rating: 5
Powered by Blogger.