सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील काेरपना तहसील अंतर्गत येणा-या मांडवा येथील त्रिवेनाबाई माध्यमिक आश्रम शाळेत भव्य महाराजस्व अभियान नुकतेच पार पडले .या अभियानचे उद्घाटन राजूरा महसुल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांचे हस्ते झाले .या वेळी प्रमुख अतिथी म्हणून राजुरा विधासभा क्षेत्राचे विद्यमान आमदार सुभाष धाेटे हे प्रामुख्याने उपस्थित हाेते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक काेरपना तहसील कार्यालयाचे तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांनी केले त्यांनी या वेळी उपस्थितीतांना महाराजस्व अभियानाचे महत्व पटवून दिले तरं आमदार सुभाष धाेटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ग्रामीण भागातील जनतेची कामे लवकर हाेण्यास अश्या प्रकारचे अभियान जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हाेवून ते नागरिकांसाठी उपयुक्त व महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान आयोजित या महसुल अभियानची त्यांनी प्रशंसा केली या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी आपले अध्यक्षिय भाषण केले सदरहु कार्यक्रमाचे निमित्याने महसुल विभागाशी निगडीत असलेल्या अनेक कामांचा निपटारा या वेळी करण्यांत आला. आयोजित अभियानात काेरपनाचे नायब तहसीलदार प्रवीण चिडे, मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे, पुरवठा अधिकारी भडारवाड, तलाठी अमाेल गाेसाई, विरेन्द्र मडावी, विशाल काेसनकर, दिलीप देठे यांनी आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली तर शारदा गांवडे, रोशनी काेल्हे, निशा साेयाम, लिपिक कनाेजवार, खविश रामटेके यांनी अभियानातील जनतेची कामे करण्यांस माेलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाला जि.प.सदस्या विणाताई मालेकर, कल्पना पेचे, झिबाल पाटील जुमनाके, सितारामजी काेडपे, संभाजी काेवे, संवर्ग विकास अधिकारी बैलनवार, कृषि अधिकारी दमाळे, डाँ .श्रीमती ताेराेणे,अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी सरीता गभिरे, त्रिवेणबाई आश्रम शाळेचे मुख्याध्यापक धवस, शिक्षिका आस्वले प्रामुख्याने हजर हाेते. कार्यक्रमाचे संचालन रामेश्वर जाधव यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांनी मानले .या महाराजस्व अभियानाला जनतेंनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला.
सर्व काेराेना नियमाचे पालन करीत पार पडलेल्या उपराेक्त अभियानाच्या अनुषंगाने काही नागरिकांना काेविडचा पहिला व दूसरा डाेज आराेग्य विभागाव्दारे या वेळी देण्यांत आला.
काेरपना महसूल विभागाचे मांडव्यात भव्य महाराजस्व अभियान !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 08, 2022
Rating:
