शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कोरोना प्रतिबंधत्मक लसीकरणास विद्यार्थ्यांनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

वणी : दि.७ जानेवारी २०२२ रोजी शि.प्र. मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कोरोना प्रतिबंधत्मक लसीकरणास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रसंगी वयोगट १५ ते १८ मधील तब्बल ६०० विद्यार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला.

केंद्र सरकार व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने ह्या लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे सहसचिव मा. श्री अशोकजी सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य मा.श्री. क्षीरसागर सर व उपप्राचार्य मा. श्री तामगाडगे सर उपस्थित होते. वणी तालुका आरोग्य विभाग वणी च्या वतीने परिचारिका मृणालिनी आवारी, प्रीती बावणे, आशासेविका वंदना ठाकरे, ताई डोंगरे, कल्पना म्हसगवळी, डाटा एन्ट्री ऑपरेटर नुपूर कांबळे, प्रदीप झाडे, अभिजित रेगुलवार, यांनी विद्यार्थ्यांचे लसीकरण केले.
(लस घेताना विद्यार्थिनी व उपस्थित शिक्षक कर्मचारी)

यावेळी शाळेतील शिक्षक मा. श्री शोभने सर, मा. श्री लांडे सर, मालगडे सर, मडावी सर, घोडमारे सर, देवाळकर सर, सिंग मॅडम, बडे मॅडम, आवारी सर, धानोरकर सर, खैरे मॅडम व इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शिबीराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
     
शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कोरोना प्रतिबंधत्मक लसीकरणास विद्यार्थ्यांनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कोरोना प्रतिबंधत्मक लसीकरणास विद्यार्थ्यांनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद Reviewed by सह्याद्री चौफेर on January 07, 2022 Rating: 5
Powered by Blogger.