सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
शहरातील एका मॅरेज हॉल मध्ये मावस बहिणीचे लग्न असल्याने साबीर शहा हा युवक राजूर कॉलरी येथून दुचाकीने लग्नासाठी जाण्याकरिता निघाला. राजूर कॉलरी पासून काही अंतरावरच राजूर फाटा येथे भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला आधी वणी येथील खाजगी रुग्णालयात व नंतर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात रेफर केले. नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना काल रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मावस बहिणीच्या लग्नाला जाण्याकरिता आनंदात निघालेल्या युवकाच्या वाटेत काळ आडवा आला. लग्नाला पोहचण्याआधीच नियतीने डाव साधला, व अपघातात त्याचा अकाली मृत्यू झाला. त्याच्या या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या युवकाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 07, 2022
Rating:
