पत्रकार ज्ञानेश्वर जुमनाकेंना आचार्य पदवी बहाल

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : आठवले कॉलेज ऑफ सोशलवर्क चिमूरच्या महाविद्यालयात एम. फील. चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्ञानेश्वर गुलाबराव जुमनाके यांनी आठवले कॉलेज ऑफ सोशलवर्क भंडाराचे डॉ. नरेश एस. कोलते यांच्या मार्गदर्शनात "आदिवासींसाठी राबविण्यात येणा-या शासकीय योजनांमुळे गोंड समाजातील सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या परिवर्तनाचे अध्ययन" (विशेष संदर्भ : चंद्रपूर जिल्हा) या विषयावर शोध प्रबंध निर्माण करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ नागपूरला आचार्य पदवी (पी.एचडी.) करिता सादर केला. नागपुर विद्यापीठाने नुकतेच काढलेल्या नोटीफीकेशनमध्ये त्यांच्या नावाचा समावेश झाला आहे.
पत्रकार ज्ञानेश्वर जुमनाके यांना आचार्य पदवी (पी.एचडी) करिता अप्रत्यक्षरित्या आठवले कॉलेज ऑफ सोशलवर्क चिमूरचे डॉ. दिवाकर कुमरे, डॉ. सुरेश हुमणे, डॉ. संजय पिठाडे, डॉ. वीणा काकडे, डॉ. रागिणी मोटघरे यांनी मार्गदर्शन स्वरुपात सहकार्य केले. त्यांनी केलेल्या संशोधनाचा आदिवासी समाजासह अन्य समूहाकरिता मोठा उपयोग होणार आहे. त्यांचे शोध प्रबंध संगणीकृत करण्याचे कार्य केमदेव वाडगुरे यांनी केले. जुमनाके यांना आचार्य पदवी (पी.एचडी.) बहाल झाल्याबद्दल पत्नी प्रगती जुमनाके, संपादक सुरेश डांगे, अधिक्वक्ता अतुल उईके, समाजसेवक सुभाष शेषकर, श्याम मुळे, भरत बंडे, फिरोज पठाण, इम्रान कुरेशी, चुन्नीलाल कुडवे, जितेंद्र सहारे, अधिवक्ता रुबिना मिर्झा, श्वेता भुते, कलीम शेख, मनोज डोंगरे, उमेश शंभरकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
पत्रकार ज्ञानेश्वर जुमनाकेंना आचार्य पदवी बहाल पत्रकार ज्ञानेश्वर जुमनाकेंना आचार्य पदवी बहाल Reviewed by सह्याद्री चौफेर on January 07, 2022 Rating: 5
Powered by Blogger.