पत्रकार दिनी न्युज मिडीया पत्रकार असोसिएशन तर्फे कोरोना योद्धांचा सन्मान

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

वणी : मराठी व्रुत्तपत्र स्रुष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी ६ जानेवारीला मुक्त ललकार कार्यालय येथे न्युज मिडीया पत्रकार असोसिएशन च्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
 सदर कार्यक्रमात कोरोना काळात जिवाची बाजी लावुन कोरोना ने मृत्यु झालेल्या ईसमावर अंतिम संस्कार करनारे न.प. कर्मचारी पथक प्रमुख भोलेश्वर ताराचंद, रोहीत बिसमोरे, शैलेश ब्राम्हने, अभिषक ताराचंद, अनिकेत मोगरे, रितेश गौतम, चेतन चवरे यांचा सन्मान चिन्ह देवुन कोरोना योद्धा म्हणुन सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन न्युज मिडीया पत्रकार असोसिएशन चे अध्यक्ष आसिफ शेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी उपाध्यक्ष दिपक छाजेड, सचिव परशुराम पोटे यांनी आप आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सागर मुने यांनी केले तर आभार निलेश चौधरी यांनी मानले.
 यावेळी संघटनेचे कोषाध्यक्ष प्रविण शर्मा, नाना बोनगीरवार, ईकबाल शेख,महादेव दोडके, रवि कोटावार, विशाल ठोंबरे ईत्यादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार दिनी न्युज मिडीया पत्रकार असोसिएशन तर्फे कोरोना योद्धांचा सन्मान पत्रकार दिनी न्युज मिडीया पत्रकार असोसिएशन तर्फे कोरोना योद्धांचा सन्मान Reviewed by सह्याद्री चौफेर on January 07, 2022 Rating: 5
Powered by Blogger.