सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी : सुदैवाने दिडशे वर्षापुर्वीचा सावित्रीबाईंचा संघर्ष तुमच्या आमच्या वाटयाला आला नाही. त्यामुळे आमच्या जाणिवा बोथट झाल्या आहे. सावित्रीबाईं व महात्मा फुलेंच्या अथक संघर्षातुन आजची स्त्री ही शिक्षीत,श्रीमंत व स्वावलंबी बनली आहे. पण समाजातील प्रतिष्ठीत स्त्रिया व त्यांचे सार्वजनिक कार्य पाहुन आपण कृतघ्न झालो,याचा पुरावा मिळतो. परंतु जिजाऊ ब्रिगेड,मराठा सेवा संघासारख्या मोजक्या संघटनांनी फुले दाम्पत्याचा विचार समाजात पोहोचविण्याकरिता सातत्याने पुढाकार घेतला आहे. हे कौतुकास्पद असुन सावित्रीबाई फुलेंचा विचार आणि संघर्ष महिलांना कायम प्रेरणादायी आहे.असे प्रतिपादन प्रख्यात विधीज्ञ अॅड वैशाली टोंगे- कवाडे यांनी केले.
मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड आयोजित दशरात्रौत्सव २०२२ निमीत्य ३ जानेवारीला संपन्न झालेल्या सावित्रीबाई फुले जयंती सोहळ्याच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांनी सदर विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा भारती राजपुत होत्या. स्थानिक कुणबी समाज सांस्कृतिक भवन येथे संपन्न कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणुन डॉ उजमा शाह,विशेष अतिथी म्हणुन मोहदा ग्रा.पं.सरपंच वर्षा राजुरकर तर प्रमुख अतिथी म्हणुन डॉ मुग्धा मुसळे,सुरेखा जावळे आणि मायाताई आसुटकर उपस्थित होत्या.
या प्रसंगी पर्यावरण जनजागृतीकरिता महाराष्ट्र भ्रमण करणारी पुनवट येथील प्रणाली चिकटे हिचा सावित्रीची लेक म्हणुन जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने मान्यवरांकडुन सन्मान करण्यात आला.तर विशेष अतिथी वर्षा राजुरकर यांचाही सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या निमीत्याने मराठा सेवा संघ चंद्रपूर प्रकाशित " बहुआयामी कार्यकर्ता -अरुण कापटे " या स्मृतीग्रंथाचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.
दशरात्रौत्सव २o२२ च्या या प्रथम दिवशीच्या कार्यक्रमाचा प्रारंभ जिजाऊ -सावित्री यांच्या अभिवादनाने झाला. मृदल कुचनकार,अमोल बावणे,सोनु थेटे,सिमा डोहे यांनी सुरेल आवाजात जिजाऊ वंदना सादर केली.वर्षा राजुरकर,प्रणाली चिकटे यांनी सन्मानाला समयोचित ऊत्तर दिले.सन्मानपत्राचे वाचन रंजना जिवतोडे व किरण गोडे यांनी केले. कार्यक्रमाची प्रास्ताविक भुमिका मिनाक्षी गायकवाड यांनी मांडली.सुत्रसंचालन सोनाली जेनेकार तर आभार विशाखा चौधरी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सुनिता वागदरकर,सरिता घागे,कविता राजुरकर,पौर्णिमा भोंगळे,ज्योती पुनवटकर,पुनम भोयर,प्रणाली बोबडे,वृंदा पेचे,छाया वागदरकर,अनिता निमेकर आणि जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
सावित्रीबाई फुलेंचा संघर्ष महिलांना आजन्म प्रेरणादायी - अॅड वैशाली टोंगे (कवाडे)
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 07, 2022
Rating:
