सह्याद्री न्यूज नेटवर्क |
वणी : क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून नवयुग पर्व वाचनालयाची सुर्वात होणे म्हणजे अंधारलेल्या वस्तीला प्रकाशाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी लोकांच्या हाती ज्ञानज्योती देवून सर्व प्रकारच्या दास्यातून मुक्तिचा संस्कार म्हणजे शिक्षण हा शिक्षणाचा अर्थ पठवून देणे होय.असे विचार क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे निमीत्याने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन करतांना अ.भा.संवैधानिक हक्क परिषद तथा महाराष्ट्र ट्रायबल आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.गीत घोष यानी आपल्या उद्घघाटनीय भाषणात व्यक्त केले.
ग्रामपंचायत कार्यालय वडजापुर येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची १९१ वी जयंती नुकतीच उत्सहात पार पडली, यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती समारंभाचे ध्वजारोहण व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सर्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन अशा दोन सत्रात पार पडला. पहिल्या सत्राच्या अध्यक्षा सौ. हेमलता बोढाले सरपंच ग्रामपंचायत वडजापुर यांचे हस्ते ध्वजारोहण पार पडले. तर दुसरया सत्राचे अध्यक्ष श्री. रामकृष्णजी मोहारे होते तर,उद्घाटक अ.भा.संवैधानिक हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गीत घोष हे होते. दिप प्रज्वलित करुन स्वागत गीताने या कार्यक्रमाची सुरूवात झाली. माणूस स्वतंत्रपणे अभिव्यक्त होण्याच स्वातंत्र्य गमावून बसला असून तो देव,धर्म व अंधश्रध्दाचा गुलाम झाला आहे. त्यामुळे तो स्वत:आपले विचार मांडायला भितो आहे याची जाणीव फुले दाम्पत्याना झाली होती. माणसाला या अज्ञानाच्या बाहेर काढायचे असेल तर, शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही म्हणून त्यांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा काढली व दास शुद्रांच्यासाठी शिक्षणाचे द्वार खुले करुन दिले. पुढे बोलतांना गीत घोष म्हणाले, जात ही मानव निर्मित असून त्या आधारे माणसात केला जाणारे भेद हे अमानवीय आहे. त्यामुळे असा भेद निर्माण करणाऱ्या साऱ्या परंपरा,ग्रंथ, वेद,पुराणांना आपण आपल्या ह्रदयातून हद्दपार केले तरच दलित, शोषित,सर्वहारा माणसाचे भविष्य उज्वल आहे.
या समारंभाचे मार्गदर्शक सौ.सोनाली ठाकुर,विवेकानंद विद्यालय, कायर, प्रा. सुरेश पाटील से.नि.प्रा.चंद्रपुर हे होते. तर,समारंभाचे उद्घाटक गीत घोष हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सौ.भावना ठाकरे, सौ.सीमा आवरी, सरपंच,पुरड, सौ. निलीमा बोंडे,सरपंच महाकालपुर,श्री. तात्याजी पावडे, सरपंच, पिंपरी, दयाशंकर मडावी (सरपंच) नायगांव(बु), श्री. मोरेश्वर वासेकर (उपसरपंच) नवरगांव, सौ.स्वाती गोवारदीपे,सौ.शशीकला महाकुलकार, सौ.शारजा आत्राम,सभापती शाळ सुधार समिती, सौ.रत्नमाला टेकाम, सौ.इंदिरा बोढाले हे होते तर,विशेष अतिथी म्हणून मा. प्रफुल ठाकरे, माजी सरपंच ग्रा. पं.वडजापुर,श्री. प्रसाद ठाकरे, श्री.संजय कोल्हेकर, श्री. धनंजय येसेकार,श्री. रामा टेकाम, श्री. दिपक ठाकरे, से.नि.पो. पा. राहुल ऊईके,श्री.बापुराव बोढाले, श्री. भाऊरावजी कोडापे, वेटरनरी, डॉक्टर, कायर, श्री. सुभाष सोनेकर, श्री. हीराजी डोहे, श्री. मारोती डाहुले, श्री. कैलासा निखाडे, म.गांधी तंटामुक्ती अध्यक्ष, श्री. पांडुरंग आत्राम, श्री. पांडुरंग उईके हे होते. मा.एस.एस.जिल्लडवार सचिव, ग्रा.पं.कार्यालय वडजापुर,ग्रामपंचायत सदस्य, श्रीमती मंगलाताई मडचापे, सौ.सविताताई येडमे, सौ.शामकलाताई गावंडे, श्री. आशीष भोंगळे, श्री. शालीक मडपाचे, श्री. अशोक टेकाम, रोजगार सेवक,श्री. शत्रुदास मडावी, शिपाई,कर्मचारी, श्री. सुनील गुंजेकर सर,श्री. वाघमारे सर, श्री. मसराम तलाठी,सौ.मेश्राम मॅडम डम, आरोग्य सेविका, श्री. एन.पी. ताजने सर,श्री. भुगे सर, कृषी सहाय्यक, वणी,कु.निषा टेकाम, कु.मनिषा मुक्के, कु.पुजा बांदुरकर, कु.कोमल चांदेकर, कु.रींकु उमरे, चि.भाष्कर ठाकरे, चि.संकेत ठाकरे यांचा याप्रसंगी उपस्थित पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या समारंभाच्या प्रास्थाविक कु.व्हि.एन.खुजे, संचालन सोनू निखाडे तर आभार कु.विषाखा माथनकर हीने मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, व सर्व वडजापुर ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.
सर्व प्रकारच्या दास्यातून मुक्तिचा संस्कार म्हणजे शिक्षण - गीत घोष
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 07, 2022
Rating:
