...आणि खासदार मैदानात उतरतात तेव्हा● खासदारांनी केला एक गडी बाद


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मारेगाव : सध्या गाव खेड्यात कबड्डी व क्रिकेटच्या सामन्याचा धुरळा उडत आहे. कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी लोकप्रतिनिधी आपली उपस्थिती दर्शवत आहे. तर काहींनी आपल्या खेळाचे प्रदर्शन देखील दाखवले आहे. असाच एक खासदारांचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर हे नेहमीच आपल्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत असतात. राजकीय क्षेत्रा सोबतच त्यांच्यात लपलेल्या सुप्त गुणांचे प्रदर्शनही ते करत असतात. खासदार धानोरकर यांना खेळा बाबत विशेष रुची असल्याने अनेक वेळा स्पर्धेचे आयोजन देखील त्यांनी केले आहे.

मारेगाव तालुक्यातील मार्डी या गावी खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार दि. 5 जानेवारीला सामन्याचे उद्घाटन करण्यासाठी व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवा या करिता खासदार धानोरकरांनी हजेरी लावली होती. रीतसर उदघाटनानंतर त्यांना खेळाचा मोह आवरला नाही आणि चक्क खासदार मैदानात उतरले.
सामन्याच्या ठिकाणी प्रचंड गर्दी जमली होती. प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचली होती. खासदार मैदानात उतरताच टाळ्या आणि शिट्ट्याचा गजर होत होता. खासदारांनी एन्ट्री घेत चक्क एक गडी बाद केला. सामन्यात त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहित केले.

आयोजित याच खेळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मागील महिन्यात त्यांच्या अर्धांगिनी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गायलेले सुरेल भजन सुध्दा चांगलेच व्हायरल झाले होते.

...आणि खासदार मैदानात उतरतात तेव्हा● खासदारांनी केला एक गडी बाद ...आणि खासदार मैदानात उतरतात तेव्हा● खासदारांनी केला एक गडी बाद Reviewed by सह्याद्री चौफेर on January 07, 2022 Rating: 5
Powered by Blogger.