वणी मूर्तिकार संघटनेच्या वतीने मूर्तिकार विश्वास बुरडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : येथील प्रसिद्ध मूर्तिकार व कला शिक्षक स्व. श्री विश्वास विठ्ठलराव बुरडकर यांचे दि. ०३ डिसेंबर २०२२ रोजी रात्री ११ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्या निमित्त वणी मूर्तिकार संघटनेच्या वतीने शहरातील काळाराम मंदिर येथे शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष श्री विजय मुकेवार , प्रमुख पाहुणे म्हणून श्री शेखर वांढरे, ज्येष्ठ मूर्तिकार श्री अशोक सोनकुसरे , श्री नत्थू डुकरे व परिसरातील अनेक मूर्तिकार व कला प्रेमी उपस्थित होते.

मूर्तिकार श्री विश्वास बुरडकर यांनी केलेल्या अनेक कामांची आठवण उपस्थितांनी करून दिली. आपल्या जीवन प्रवासात त्यांच्या सानिध्यात अनेक कलाकार असे घडले याचे दाखले ही अनेकांनी दिले. कलाप्रेमी व कलाकारांच्या मनात कायम एक आदराचे स्थान राहील असे मत ज्येष्ठ मूर्तिकार अशोक सोनकुसरे यांनी व्यक्त केले.
मूर्तिकारांचे एकीकरण व संघटनेची स्थापना हीच खरी श्रद्धांजली ठरेल अशी भावना श्री विजय मुकेवार यांनी व्यक्त केली.
वणी मूर्तिकार संघटनेच्या वतीने मूर्तिकार विश्वास बुरडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. वणी मूर्तिकार संघटनेच्या वतीने मूर्तिकार विश्वास बुरडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. Reviewed by सह्याद्री चौफेर on January 06, 2022 Rating: 5
Powered by Blogger.