सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : सुमतीबाई गोरे ट्रस्टच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. त्यात राजूरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या आर्वी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या शिक्षिका करुणा गावंडे- जांभुळकर यांची निवड झाली आहे.
सदरहु पुरस्कार सोहळा येत्या १६ जानेवारीला पुणेच्या उद्यान कार्यालय सदाशिव पेठ -३०येथे ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. स्वतःतील गुणवत्तावाढ, सामाजिक व शैक्षणिक कार्यातील वेगळेपणा, साहित्यिक सहभाग व विद्यार्थी विकासातील वेगळे प्रयोग व केलेले प्रयत्न या निकषांच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे. या साठी राज्यभरातील एकूण २१ शिक्षकांची निवड समितीद्वारे करण्यात आली असुन वरील निवडीत शिक्षिका करुणा गावंडे - जांभुळकर यांचीही निवड झाली आहे. त्यांना हा पुरस्कार जाहिर झाल्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव हाेत आहे.
करुणा गावंडेंची राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कारासाठी निवड!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 06, 2022
Rating:
