प्रयत्नांची पराकाष्ठा : बंगलाेर वरुन आणले रूग्णासाठी नागपूरात रक्त !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारार्थ उज्जेर सिंह सऊद नावाचे हे रुग्ण भरती आहे त्यांना अत्यंत दुर्मिळ असलेल्या AB निगेटीव्ह रक्ताची गरज हाेती, ते रक्त बंगलोरहून विमानाने नागपूरात नुकतेच आणण्यांत आले आहे. 
अत्यंत दुर्मिळ असलेल्या या रक्तासाठी रुग्णाला तब्बल ३ ते ४ दिवस प्रतिक्षा करावी लागली. शेवटी चंद्रपूर येथील रक्त संयोजक रिंकू कुमरे यांनी अमित जैन यांना फोन करून या गटाच्या AB निगेटिव्ह रक्ताची व्यवस्था करण्यास सांगितले.

दरम्यान, शंकर नारायण आणि मधु कालीराजन दाेघांनी तात्काळ अर्ध्या तासात लायन्स ब्लड बँक बेंगळुरू येथे जावून रक्तदान केले. त्यानंतर ते रक्त कार्गो सेवेद्वारे बंगळुरूहून नागपूरला पाठवण्यात आले.

चंद्रपूरच्या रिंकू कुमरे आणि सरस्वती सऊद यांनी रुग्णाचे प्राण वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रुग्णाच्या सेवेसाठी लायन्स ब्लड बँकेच्या सूरजचे विशेष सहकार्य लाभले.

सदरहु रुग्णाच्या नातेवाइकांनी रक्तपुरवठा करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे व रक्तदात्यांचे आभार मानले आहे.
प्रयत्नांची पराकाष्ठा : बंगलाेर वरुन आणले रूग्णासाठी नागपूरात रक्त ! प्रयत्नांची पराकाष्ठा : बंगलाेर वरुन आणले रूग्णासाठी नागपूरात रक्त ! Reviewed by सह्याद्री चौफेर on January 10, 2022 Rating: 5
Powered by Blogger.