वणीतील तरुणांच्या दुचाकीला अपघात; करणवाडी फाट्यावरील घटना


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
    
मारेगाव :  मारेगाव-यवतमाळ हायवे वर वणी येथील दुचाकी स्वाराचे नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल डिव्हाडर वर आदळून अपघात झाला. ही घटना आज दि.१० सोमवार रोजी सायंकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान, करणवाडी फाट्यावर घडली. यात दोन तरुण गंभीर जखमी झाले आहे.

सूत्राच्या माहितीनुसार वणी तालुक्यातील सचिन बागरडे (२८) रा. शाम टॉकीज, गोपाल कुरवडे (३०) रा. खाती चौक हे दोघेही दुचाकीने (MH 34 Q 4368) शिबला येथून काम आटोपून नवरगाव मार्गे वणीकडे जाण्यासाठी निघाले असता, करणवाडी फाट्या जवळ दुचाकीवरून नियंत्रण सुटून मोटारसायकल डिव्हाडर वर आदळली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती घटनास्थळावरील लोकांनी पोलिस स्टेशनला देण्यात आली. मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांना मारेगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.


वणीतील तरुणांच्या दुचाकीला अपघात; करणवाडी फाट्यावरील घटना वणीतील तरुणांच्या दुचाकीला अपघात; करणवाडी फाट्यावरील घटना Reviewed by सह्याद्री चौफेर on January 10, 2022 Rating: 5
Powered by Blogger.