सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा स्वातंत्र्य संग्राम सैनिक कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची आज १० जानेवारीला सकाळी ९.३० वाजता शहरातील कन्नमवार चौक येथे १२२ वी जयंती साजरी करण्यात आली. त्यांची जयंती शासकीय करण्याकरिता राज्यभर आंदोलन उभारण्याचा संकल्प दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समितीचे प्रचारक गजानन चंदावार यांनी त्यांच्या जयंती दिनी केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेलदार समाज बहूउद्देशीय संस्था वणीचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार वामनराव कासावार, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा नगर सेवक राकेश बुग्गेवार, जेष्ठ समाज सेवक गजानन गट्टेवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन चंदावार यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी विदर्भपुत्र स्व. मा.सा. उर्फ दादासाहेब कन्नमवार यांच्या विषयी विस्तृत माहिती दिली. दादासाहेब कन्नमवार हे महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री होते. त्यांची शासकीय स्तरावर जयंती साजरी व्हावी, याकरिता २०१३ पासून बेलदार समाज संघटना शासनाकडे पत्रव्यवहार करित आहे. संघटनेने लोकप्रतिनिधींमार्फतही शासनाकडे पत्रव्यवहार केला. पण यावर्षीही शासनाला दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंतीचा विसर पडला. यापुढे मात्र दादासाहेब कन्नमवार यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याकरिता आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे दादासाहेब कन्नमवार प्रचार प्रसार समितीचे प्रचारक गजानन चंदावार यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार यांनी आपल्या भाषणात दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंतीचा प्रचार प्रसार महाराष्ट्रभर करू असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन राकेश बरशेट्टीवार यांनी तर आभार प्रदर्शन विशाल बोरकुटवार यांनी केले.
कार्यक्रमाला ज्ञानेश्वर बोनगीरवार, विठ्ठल पडलवार, विनोद महाजनवार, रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे, महिला कार्यकारणी अध्यक्षा अल्काताई दुधेवार, शहर कार्यकारणी अध्यक्ष संदीप मृत्यलवार, ओबीसी जातीनिहाय जनगणना कृती समितीचे समन्वयक प्रवीण खानझोडे, अनिल ठाकूरवार, भैय्याजी बदखल, काँग्रेस सेवादलाचे बाबाराव गेडाम, प्रविण येलपुलवार, राजू बोईनपेल्लीवार, विलास चिट्टलवार, अमोल बुग्गेवार, राजू धावंजेवार, अनिकेत कुचेवार, शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोद लोणारे, अविनाश पोचमपेल्लीवार, सुनील मुत्यलवार, सुरेश चिट्टलवार, दिगांबर पालमवार, काजल पुरमशेट्टीवार, रसिका बेझलवार, प्रिती आकुलवार तथा बेलदार समाज बांधव उपस्थित होते.