सह्याद्री न्यूज | वासुदेव राठोड
किनवट : गोर सीकवाडीचे मुखिया,गोर बंजारा समाज संघटित करण्यासाठी त्यांना एकत्र करून मार्गदर्शन करणारे क्रांतीसुर्य काशिनाथ नायक यांची जयंती सर्वत्र साजरी करण्याची गरज आहे.त्यांनी समाजाला अंधश्रद्धेपासून दूर ठेवून गोर बंजारा समाजाची बोली भाषा त्यांचीवेषभूषा, केशभूषा, सन,तेव्हार टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. गोर बंजारा समाजाला स्वतःची ओळख निर्माण करून दिली आहे. एवढेच नव्हे तर समाजासाठी लढा उभारून वेळोवेळी समाजाला न्याय मिळवून दिला आहे. सर्वांना संघटित करण्यासाठी, वेळोवेळी गोर बंजारा समाजाचा मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करून सर्व भारतातील गोर बंजारा समाजाला एकत्र बसवून मार्गदर्शन लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन त्यांना प्रेरित करण्यासाठी रात्रंदिवस प्रत्येक तांडयात जाऊन समाज कार्य त्यांनी केले आहे.
ज्यांचा आदर्श घेऊन त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये आज लाखो लोक समाज कार्य करत आहेत,गोर सीकवाडी चळवळ सर्व लोकपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करत आहेत अशा आमच्या सर्वांचे आदर्श मार्गदर्शक गोर सीकवाडीचे मुखिया क्रांतीसुर्य काशिनाथ नायक यांची जयंती १३ जानेवारी रोजी कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव लक्षात घेऊन जे सरकारचे नियम असतील त्यांचे पालन करून सर्वत्र आणि प्रत्येक घराघरामध्ये जयंती साजरी करण्यात यावी असे, आवाहन गोर केसुला ग्रुप महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव राठोड यांनी केले आहे.
क्रांतीसुर्य काशिनाथ नायक यांची जयंती सर्वत्र साजरी करण्यात यावी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 11, 2022
Rating:
