सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : शहरालगत असलेल्या चिखलगाव येथिल एका अल्पवयीन मुलीवर त्याच गावातील तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार मुलीने वणी पोलिस स्टेशनला नोंदविली आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली असुन त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
चिखलगाव येथिल एका मुलीचे त्याच गावातील तरुणाशी प्रेमसंबंध होते. प्रेम संबंधाचे रुपांतर शारिरीक आकर्षणत होऊन तरुणाने तिच्याशी लाडीगोडी लाऊन शारिरीक संबंध प्रस्थापीत केले. लग्नाचे आमिष दाखवून तो सतत तिचे शारिरीक शोषण करू लागला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर जबरदस्ती तिच्यावर तो लैंगिक अत्याचार करू लागला. कधी तिच्या घरी जाऊन तर कधी तिला निर्जणस्थळी नेऊन आपली वासना पूर्ण करू लागला. मार्च 2018 पासुन आरोपी तिचे लैंगिक शोषण करित असल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे. 6 जानेवारीला मुलगी महाविद्यालयात लसीकरणाकरीता जात असतांना आरोपीने जबरदस्ती तिला दुचाकीवर बसविले, व वरझडीच्या जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याची हिंमत एवढी वाढली की, 10 जानेवारीला सरळ तो तिच्या घरी आला व माझ्या सोबत चल म्हणत जबरदस्ती करू लागला. मुलीने त्याच्या सोबत जाण्यास नकार देताच त्याने तिचे केस पकडून गालावर थापडा मारत तिला जबरदस्ती ओढत नेण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार पाहुन आई व आजोबांनी मुलीला त्याच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्या आई आजोबांनीही शिविगाळ केली. या सर्व प्रकाराने व वारंवार त्याच्या कडुन होणाऱ्या लैंगिक अत्याचाराने धास्तावलेल्या मुलीने अखेर आपल्या आईला सोबत घेऊन वणी पोलिस स्टेशनला आरोपी गणेश गोविंद वरारकर (21) रा. चिखलगाव याच्या विरुध्द लैंगिक अत्याचाराची तक्रार नोंदविली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ आरोपीला अटक केली. 11 जानेवारीला रात्री 1.53 वाजता पिडीतेने पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली, व रात्रीच पोलिसांनी आरोपी गणेश वरारकर याला अटक केली. आरोपीवर भादंवि च्या कलम 376 (2)(3)(J)(N), 452, 323, 506 व सहकलम 4, 6 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात सपोनि शिवाजी टीपूर्णे व पोलिस शिपाई अमोल नुंनलवार करित आहे.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 11, 2022
Rating:
