बहुचर्चित व्यापारी राधेश्यामकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग,रामपूरची घटना

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : जिल्ह्याच्या राजूरा तहसील अंतर्गत येत असलेल्या रामपूर येथील एका व्यापा-यांने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना काल साेमवारी घडली.

या घटनेबाबत हाती आलेल्या माहिती नुसार असे कळते की, राधेश्याम नावाने बहुचर्चित असलेल्या व्यापा-याचे किराणा व स्टेशनरी दुकान रामपूर या गावी ब-याच दिवसांपासून आहे. या दुकाना च्या काही अंतरावर एक कॉलनी आहे. या कॉलनीतील एक बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी रजिस्टर आणण्यासाठी गेली असता तिला त्या ६५ वर्षिय व्यापा-याने दुकानातच कवटाळले,हा प्रकार बघुन मुलगी भयभीत झाली लगेच घरी येवून तिने ही संपूर्ण घटना आईस सांगितली. लगेच आईने राजूरा पाेलिस स्टेशन गाठून बहुचर्चित व्यापारी विरुद्ध तक्रार दाखल केली.

पाेलिसांनी तात्काळ या आराेपी विरुद्ध कलम ३५४ ए (१) व पाेस्काे नुसार गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली या बाबत पाेलिस अधिक चाैकशी करीत असल्याचे समजते. 
बहुचर्चित व्यापारी राधेश्यामकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग,रामपूरची घटना बहुचर्चित व्यापारी राधेश्यामकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग,रामपूरची घटना Reviewed by सह्याद्री चौफेर on January 11, 2022 Rating: 5
Powered by Blogger.