वनविभागाच्या दडपशाही धोरणाविरुद्धच्या आक्रोश मोर्चाला स्थगिती ! कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे घेतला निर्णय
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : ताडोबा बफर झोन क्षेत्रांतर्गत गुरुप्रसाद व वन विभागाच्या अमानवीय अन्याय-अत्याचाराला घेऊन दडपशाही धोरणाविरोधात उलगुलान संघटना द्वारा राजु झोडे यांच्या नेतृत्वात आदिवासी व दलित तसेच जबरान जोत शेतकऱ्यांना घेऊन मूल नगरीत आक्रोश मोर्चा काढण्यात येणार होता. या मोर्चाला कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत स्थगिती देऊन आमचा लढा असाच सुरू राहणार असल्याचे राजू झोडे म्हणाले.
सध्या देशभरात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे. त्यामुळे शासकीय व प्रशासकीय स्तरावरून विविध निर्बंध लादलेले आहे शिवाय कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता गर्दी जमवणे हे नैतीकतेच्या विरोधात आहे. उलगुलान संघटना साेबत सदैव लाेक राहत असते पोलिस प्रशासनाकडून व तालुका प्रशासनाकडून आक्रोश मोर्चा न घेण्याबाबतचे पत्र दिले असून माेर्चाची परवानगी सुद्धा नाकारलेली आहे.
उद्या दि. १२ जानेवारीला होणारा आक्रोश मोर्चा काही काळापर्यंत स्थगित करण्यात येत आहे याची मोर्चाला येणाऱ्या नागरिकांनी नोंद घ्यावी असे, आवाहन राजू झोडे यांनी केले आहे. परंतु वनविभागाच्या अत्याचारा विरोधात लढा पूर्ण ताकदनिशी सुरू राहणार असल्याचे राजु झाेडे या वेळी म्हणाले.
वनविभागाच्या दडपशाही धोरणाविरुद्धच्या आक्रोश मोर्चाला स्थगिती ! कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे घेतला निर्णय
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 11, 2022
Rating:
