कै. मा.सा. कन्नमवार जयंती निमित्य वाचनालयाला आलमारीची भेट

सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

सावली : महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री आदरणीय मा.सा. उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंती निमित्य त्यांना अभिवादन करीत सावली येथील कै. मा.सा. कन्नमवार सार्वजनिक वाचनालयात दि महाराष्ट्र अर्बन को ऑप. संस्थेच्या वतीने पुस्तके ठेवण्यासाठी कपाट देण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष चरणदासजी बोम्मावार यांनी या कपाट चे फित कापून उदघाटन केले. यावेळी वाचनालय चे अध्यक्ष सूरज बोम्मावार, तसेच दि महाराष्ट्र अर्बन चे संचालक,व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

कोविड 19 मुळे छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वाचनालयाच्या वतीने पतसंस्थेचे आभार मानण्यात आले.
कै. मा.सा. कन्नमवार जयंती निमित्य वाचनालयाला आलमारीची भेट कै. मा.सा. कन्नमवार जयंती निमित्य वाचनालयाला आलमारीची भेट Reviewed by सह्याद्री चौफेर on January 11, 2022 Rating: 5
Powered by Blogger.