जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या वाढदिवशी मनीष बतरा यांचा शिवसेनेत प्रवेश

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या वाढदिवशी राष्ट्रवादी कांग्रेसचे माजी शहराध्यक्ष मनिष बतरा यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधलेले संजय देरकर यांच्या वाढदिवशी मनिष बतरा यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांच्या शहरातील जनसंपर्काचा शिवसेना पक्ष संघटनेला मोठा फायदा होणार आहे. शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दीपक कोकास व शहर प्रमुख राजू तुराणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मनीष बतरा यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अविनाश भुजबळ, युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, युवासेनेचे माजी शहराध्यक्ष ललित लांजेवार, शिवसेनेचे माजी शहर संघटक महेश पहापळे, विभाग प्रमुख मंगल भोंगळे, शाखा प्रमुख जनार्दन थेटे, प्रविण खानझोडे आदी उपस्थित होते. 
संजय देरकर यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात जोखीम पत्कारून रुग्णसेवेला प्राधान्य देणाऱ्या आशा गटप्रवर्तकांचा साळी चोळी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही, त्यांच्या करिता लसीकरणाचीही व्यवस्था करण्यात आली. "घर तेथे शिवसैनिक" सदस्य नोंदणी अभियानाला त्यांच्या वाढदिवशी शुभारंभ करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वही, बुक व पेन देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. हे गोळा झालेले शैक्षणिक साहित्य गरीब गरजवंत विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. स्त्री सन्मान शक्ती संघटनेच्या महिलांनीही संजय देरकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य देऊन शुभेच्छा दिल्या. राजूर येथील स्त्री सन्मान शक्तीच्या अध्यक्षा प्रणिता मो. असलम व संघटनेच्या सदस्य महिला यावेळी उपस्थित होत्या. संजय देरकर यांच्या अर्धांगिनी व स्त्री सन्मान शक्ती संघटनेच्या प्रमुख किरण देरकर यांनी संजय देरकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतांना पुष्पगुच्छ न देता वही व पेन देण्याचे आव्हान केले होते. संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक व राजकीय उपक्रम राबविण्यात आले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या वाढदिवशी मनीष बतरा यांचा शिवसेनेत प्रवेश जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर यांच्या वाढदिवशी मनीष बतरा यांचा शिवसेनेत प्रवेश Reviewed by सह्याद्री चौफेर on January 19, 2022 Rating: 5
Powered by Blogger.