मारेगाव नगर पंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर, काँग्रेसचे पाच तर सेना,भाजपचे प्रत्येकी चार उमेदवार झाले विजयी
सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
मारेगाव नगर पंचायतेच्या आधी १४ व नंतर ३ अशा एकूण १७ वार्डांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचे आज निकाल जाहीर झाले. कुण्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसून राजकीय पक्षांना मतदारांचा संमिश्र कौल मिळाला आहे. मारेगाव नगरपंचायतेच्या निवडणूक निकालाकडे वणी उपविभागाचे लक्ष लागले होते. नगर पालिका निवडणुकीची रंगीत तालीम म्ह्णून या निवडणुकीकडे पहिले जात होते. पण मतदारांचा संमिश्र कौल मिळाल्याने पक्षांचे गणित बिघडले आहे. अपेक्षेनुसार यश न मिळाल्याने राजकीय पक्षांमध्ये नाराजीही दिसून आली. या नगर पंचायत निवडणुकीमध्ये १७ वार्डातून विजयी झालेले उमेदवार याप्रमाणे आहेत, वार्ड क्रमांक एक मधून काँग्रेसच्या अनिता नत्थू परचाके (११५), वार्ड क्रमांक दोन मधून शिवसेनेच्या माला गुकुळदास बदकी (१५७), वार्ड क्रमांक तिन मधून अपक्ष नंदेश्वर खुशालराव आसुटकर (१२६), वार्ड क्रमांक चार मधून मनसेचे शेख अंजुम शेख नबी (८२), वार्ड क्रमांक पाच मधून शिवसेनेच्या वर्षाताई किशोर किंगरे (१७३), वार्ड क्रमांक सहा मधून भाजपच्या हर्ष अनुप महाकुलकार (१९८), वार्ड क्रमांक सात मधून काँग्रेसच्या छाया प्रदीप किनाके (१००), वार्ड क्रमांक आठ मधून भाजप चे वैभव सुभाषराव पवार (७८), वार्ड क्रमांक नऊ मधून शिवसेनेचे मनीष तुळशीराम मस्की (१३८), वार्ड क्रमांक दहा मधून काँग्रेसच्या सुनीता गजानन किन्हेकार (१११), वार्ड क्रमांक अकरा मधून काँग्रेसचे थारांगणा खालिद अहमद (१४४), वार्ड क्रमांक १२ राष्ट्रवादीचे हेमंत नरहरी नरांजे (९४), वार्ड क्रमांक तेरा मधून मनसेचे अनिल उत्तम गेडाम (७०), वार्ड क्रमांक चौदा मधून काँग्रेसचे आकाश युवराज बदकी (१०२), वार्ड क्रमांक पंधरा मधून भाजपच्या सुशीला डोमाजी भादीकर (८३), वार्ड क्रमांक सोळा मधून भाजपचे राहुल राजू राठोड (८४) तर वार्ड क्रमांक सतरा मधून शिवसेनेचे जितेंद्र मारोती नगराळे (८९) विजयी झाले आहेत.
मारेगाव नगर पंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर, काँग्रेसचे पाच तर सेना,भाजपचे प्रत्येकी चार उमेदवार झाले विजयी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 19, 2022
Rating:
