सौ सावित्रीताई लकुले यांची महिला आघाडी नांदेड जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

नांदेड : भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य समिती च्या महिला आघाडी नांदेड जिल्हाध्यक्ष पदी तालुका-जिल्हा नांदेड च्या सावित्री प्रल्हाद लकुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर निवड संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे पत्र नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश उत्तमराव जाधव यांनी दिले आहे.

या नियुक्ती बद्दल जिल्हा सचिव संदीप वानखेडे, मराठवाडा कार्याध्यक्षा सीमा स्वामी लोहराळकर, महिला जिल्हा सचिव कविता डोनेकर, प्रसिद्धी प्रमुख आनंद सोनटक्के, सदानंद गजभारे सर, अर्चना शर्मा, प्रणिता जोशी, प्रणिता देशमुख, रंजनी मडपल्लेवार, परमेश्वर सूर्यवंशी (जिल्हाध्यक्ष), स्वातीताई कुलकर्णी, विजयाताई काचावार, व्‍यंकटी नरबाजी मोरे (जिल्हा संपर्क प्रमुख), श्री दादाराव खंदारे (तालुका अध्यक्ष हदगांव), यांच्या सह नांदेड जिल्ह्यातील सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच कार्यकर्त्याच्या वतीने सौ सावित्री लकुले यांना अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सौ सावित्रीताई लकुले यांची महिला आघाडी नांदेड जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती सौ सावित्रीताई लकुले यांची महिला आघाडी नांदेड जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती Reviewed by सह्याद्री चौफेर on January 19, 2022 Rating: 5
Powered by Blogger.