धारदार शस्त्र हातात घेऊन परिसरात दहशत पसरविणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : धारदार शस्त्र हातात घेऊन परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ५ जानेवारीला सायंकाळी ६.३० ते ७ वाजताच्या सुमारास रंगनाथ नगर येथे एका घराजवळील सार्वजनिक ठिकाणी एक उचापतखोर युवक धारदार शस्त्र हातात घेऊन धुमाकूळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे एक युवक हातात धारदार शस्त्र घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी शस्त्राने दहशत पसरविणाऱ्या युवकाला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील ते धारदार शस्त्र जप्त केले. सार्वजनिक ठिकाणी शस्त्रासह धुमाकूळ घालणाऱ्या आरोपी युवकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

शहरातील रंगनाथ नगर येथील सार्वजनिक ठिकाणी एक उचापतखोर युवक हातात धारदार शस्त्र घेऊन धुमाकूळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ रंगनाथ नगर परिसराकडे धाव घेतली. माहिती मिळालेल्या ठिकाणी पोलिस गेले असता तेथे राजू झिलपे यांच्या घराजवळ सार्वजनिक ठिकाणी एक युवक हातात धारदार गुप्ती घेऊन परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरवीत असल्याचे त्यांना आढळून आले. हातात गुप्ती घेऊन परिसरात दहशत पसरविणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याजवळील गुप्ती जप्त केली. पोलिसांनी त्याला त्याचे नाव विचारले असता मो. समीर मो. गणी (२०) रा. खडबडा मोहल्ला असे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्याजवळून ४६ से.मी. लांब व ३२ से.मी. रुंद असलेली गुप्ती जप्त केली. आरोपी मो. समीर मो. गणी याच्यावर पोलिसांनी कलम ४/२५ आर्म ऍक्ट व सहकलम १३५ बी.पी. ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, अशोक टेकाळे, हरिन्द्रकुमार भारती, विशाल गेडाम, शंकर चौधरी यांनी केली.
धारदार शस्त्र हातात घेऊन परिसरात दहशत पसरविणाऱ्याला पोलिसांनी केली अटक धारदार शस्त्र हातात घेऊन परिसरात दहशत पसरविणाऱ्याला पोलिसांनी केली अटक Reviewed by सह्याद्री चौफेर on January 06, 2022 Rating: 5
Powered by Blogger.