सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मारेगाव : भरधाव ऑटो पलटी, ३ जखमी तर दोघांची प्रकृती गंभीर
मारेगाव-यवतमाळ हायवेवरील घटना
यवतमाळ डंका :
मारेगाव : येथून खंडणीकडे प्रवासी घेवून जाणारा ऑटो यवतमाळ हायवेवरील जुन्या चुनाभट्टीच्या जवळपास भरधाव प्रवासी ऑटो पलटी झाला. यात ३ जखमी तर दोघांची प्रकृती गंभीर असून आज दि.१२ जानेवारी रोजी सांयकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
तालुक्यातील भुरकी पोड (खंडणी) भरधाव प्रवासी ऑटोने गावाकडे जाणाऱ्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑटो पलटी होऊन अपघात झाला. यात शंकर लेतू टेकाम वय (४५) रा. भुरकी पोड (खंडणी), राजू सुधाकर टेकाम (१८) रा. भुरकी पोड (खंडणी), किरण देवाजी टेकाम (१०) रा. भुरकी पोड (खंडणी), असे अपघातामध्ये गंभीर जखमीचे नाव आहे. त्यांना मार लागल्याने मारेगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, जखमी वर मारेगाव येथे उपचार सुरू असून,पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होवून घटनेचा पंचनामा करण्यात आला. या अपघातात ऑटो चालकासह ३ प्रवासी दुर्दैवाने थोडक्यात बचावले आहे.
घटनेचा अधिक तपास मारेगाव पोलीस करत आहे.
ऑटो पलटी: तीन प्रवासी गंभीर जखमी;अहफाज जिनिंग जवळील घटना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 12, 2022
Rating:
