आदिवासी युवकांना मारहाण प्रकरणी दोषींना शिक्षा झाली पाहिजे - उलगुलान संघटनेची मागणी

सह्याद्री न्यूज : किरण घाटे

चंद्रपूर : ताडोबा बफर झोन क्षेत्रांतर्गत आदिवासी व दलित मोठ्या संख्येने राहतात. सदरहु आदिवासी व गैरआदिवासी यांच्या शेतजमीनी मागील अनेक वर्षापासून अतिक्रमीत आहेत. उपराेक्त जमिनीचे पट्टे मिळण्याचे प्रकरण व दावे प्रलंबित आहेत तरी सुद्धा या क्षेत्राचे अधिकारी गुरुप्रसाद शेतकऱ्यांना धमकावणे, मारझोड करणे, पिकांची नुकसान करणे असे काम आपल्या कर्मचाऱ्यांकडून करवून घेत आहे. या शिवाय कायदा हातात घेऊन कोणतीही चौकशी न करता आदिवासी व दलितांना अमानुष व अमानवीय मारहाण करायला लावतात. नुकत्याच चिंचोली या गावात शिकारीच्या संशयावरून येथील काही युवकांना अतिशय क्रूरपणे मारझोड करून वन विभागाने अन्यायाचा कळस गाठला होता. ही घटना ताजी असतानाच डोनी व फुलझरी या गावातील काही युवकांना रात्री उचलून रात्रभर आपल्या कर्मचाऱ्यांना सांगून गुरुप्रसाद यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी नाहगमकर, वनपाल धुर्वे, चनकापुरे, बोरकर, वाघमारे,व एसटीपीएफ टीमच्या हातून अमानुष मारहाण केली. भारत कोवे याला वाघाने मारले नसून याचा खून तुम्हीच केला असे कबुल करा व बयान द्या म्हणून मरेस्तोवर मारले. कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेऊन सदरहु आदिवासी युवकांना फसवण्याचा प्रकार सुद्धा केला गेला आहे.

सदरहु प्रकरण मानवतेला काळीमा फासणारे असून बफर झोन क्षेत्रांतर्गत असणाऱ्या गावातील नागरिकांमध्ये गुरुप्रसाद यांच्या विषयी भीती व दहशत निर्माण झालेली आहे. या प्रकरणाला उलगुलान संघटनेचे राजु झोडे न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत असताना गुरुप्रसाद यांनी प्रकरण दडपण्यासाठी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत राजू झोडे व आशिष नैताम व इतरांवर वाघाची शिकार करण्यासाठी फासे लावले असा खोटा आरोप लावून गुन्हे दाखल करावयास लावले. गुरुप्रसाद हे नेहमी आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून आदिवासी दलित व इतर नागरिकांना नेहमी त्रास देत असतात. तरी वरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून ताडोबा क्षेत्र संचालक गुरुप्रसाद व त्यांना मदत करणारे दोषी अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे निवेदन तहसीलदार यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच वन विभागाच्या संबंधित विभागीय अधिकाऱ्यास देण्यात आले.

यावेळी निवेदन सादर करतांना राजू झोडे, संपत कोरडे, मनोज जांभुळे, जितेंद्र बोरूले, रुपेश निमसरकार, विकास कुळमेथे उपस्थित होते.
आदिवासी युवकांना मारहाण प्रकरणी दोषींना शिक्षा झाली पाहिजे - उलगुलान संघटनेची मागणी आदिवासी युवकांना मारहाण प्रकरणी दोषींना शिक्षा झाली पाहिजे - उलगुलान संघटनेची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on January 12, 2022 Rating: 5
Powered by Blogger.